Ranveer Singh: न्यूड फोटो शूट प्रकरणी पोलिसांनी नोंदवला रणवीर सिंगचा जबाब; दोन तास चौकशी

तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी रणवीरला जाण्यास परवानगी दिली.
ranveer singh
ranveer singh Instagram

मुंबई - न्यूड फोटो शूट प्रकरणी रणवीर सिंगला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) काही दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले होते. त्यांनतर आज रणवीर सिंगने (Ranveer Singh) पोलिसात आपला जबाब नोंदवला आहे.चेंबूर पोलीस ठाण्यात आज सकाळी लिगल टिमसह रणवीर सिंगचा जबाब नोंदवण्यात आल. तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी रणवीरला जाण्यास परवानगी दिली. मात्र पुढेही या प्रकरणात चौकशीस सहकार्य करण्याच्या सूचना पोलिसांनी रणवीर सिंगला दिल्या आहेत.

हे देखील पाहा -

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर खूप चर्चेत होता. तर काहींनी त्याच्यावर टीका केली. एवढेच नाही तर अभिनेत्याविरोधात अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ranveer singh
MNS: महिलांवरील अत्‍याचार रोखण्यासाठी प्रयत्न; धुळ्यात मनसेची भुमिका

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी रणवीरने एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ झाला होता. या फोटोवरून अनेकांनी रणवीरवर टिका देखील केली होती. तर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला.

त्यानंतर रणवीरविरोधात मुंबईत एका खासगी संस्थेने तसेच महिला वकिलाने पोलिसात तक्रार दिली होती. रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या एनजीओकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आता रणवीरला मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com