JHARKHAND HORROR: WIFE AND LOVER ARRESTED FOR SANJAY LOHRA MURDER, SEVERED HEAD FOUND AFTER 17 DAYS Saam Tv
देश विदेश

Shocking : खळबळजनक! प्रेमात पतीचा अडथळा, पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काटा; शीर धडावेगळं केलं

Jharkhand Crime news : झारखंडच्या रांचीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • झारखंडच्या रांचीमध्ये २९ वर्षीय तरुणाची हत्या

  • पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड

  • हत्येनंतर मृतदेह जाळून जंगलात फेकला

  • पोलीस तपास सुरु

झारखंडमधील रांची मधून धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. २९ वर्षीय व्यक्ती संजय लोहराची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे हे कृत्य त्याच्याच पत्नीने आणि तिच्या प्रियकराने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात संजय यांची पत्नी सुबोधिनी देवी आणि तिचा प्रियकर रमन सेठ यांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी रांचीजवळील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले शरीर आढळून आले होते. मात्र, मृतदेहाचे शीर गायब असल्यामुळे पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तब्बल १७ दिवसांनंतर पोलिसांना त्याच जंगल परिसरातून धडापासून वेगळे केलेले शीर सापडले. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख संजय लोहरा अशी पटली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुबोधिनी देवीचे रमन सेठ याच्याशी प्रेमसंबंध होते. तिला रमनसोबत लग्न करायचे असल्याने दोघांनी मिळून संजय लोहराची हत्या करण्याचा कट रचला. पोलिस चौकशीत सुबोधिनीने या कटाची कबुली दिली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रमन सेठने आपल्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर मृतदेह जंगलात नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी शीर वेगळे करून जंगलात पुरल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. तसेच मृतदेह नेण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी वापरण्यात आलेली एक कारही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाबाबत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध वेगाने घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Transgender Fight: बस्ती मागण्यावरून वाद विकोपाला; आळंदीच्या इंद्रायणी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT