Jharkhand Chief Minister Hemant Soren mother Rupi Soren death news saam tv
देश विदेश

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना मातृशोक! भाजपचे दिग्गज नेते अंत्यदर्शनासाठी; राजकीय वर्तुळात शोककळा

Jharkhand Chief Minister Hemant Soren Mother Rupi Soren Death News: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मातोश्री आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या पत्नी रूपी सोरेन यांचे निधन झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू, अर्जुन मुंडा आणि विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला.

Omkar Sonawane

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मातोश्री आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या पत्नी रूपी सोरेन यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनीही रूपी सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दित्य साहू यांनी माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह रांचीतील मोरहाबादी येथील निवासस्थानी जाऊन रूपी सोरेन यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आदित्य साहू म्हणाले की, रूपी सोरेन यांचे निधन अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. सोरेन कुटुंबासह संपूर्ण झारखंड राज्यासाठी हानी आहे. या दुःखाच्या प्रसंगी भाजप शोकाकुल सोरेन कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तसेच दिवंगत आत्म्यास शांती लाभावी आणि सोरेन कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

बाबूलाल मरांडी यांच्याकडूनही शोक व्यक्त

झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनीही रूपी सोरेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते नेमरा येथे झालेल्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित होते. रूपी सोरेन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, दिवंगत आत्म्यास शांती लाभावी आणि शोकाकुल सोरेन कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली.

रूपी सोरेन यांच्यासोबतच्या आठवणींबद्दल बोलताना बाबूलाल मरांडी म्हणाले की, त्यांच्यासोबतच्या वैयक्तिक भेटींची कोणतीही विशेष आठवण त्यांना सध्या आठवत नाही. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने दिवंगत शिबू सोरेन, दिवंगत दुर्गा सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्याशीच संवाद होत असे. मात्र, १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत रूपी सोरेन यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, अशी आठवणही मरांडी यांनी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, हॉटेलवर बोलावलं; मुलीसोबत भयंकर घडलं

दिल्लीच्या रस्त्यांवर प्रियंका गांधींचा 'रुद्रावतार', 'इंदिरा इज बॅक', सोशल मीडियावर नवा ट्रेंड

Palghar Earthquake: पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, नागरिकांची घराबाहेर धाव; परिसरात भीतीचे वातावरण

राहुल गांधींचे बेधडक आंदोलने, आता पर्यंत किती अन् कोणते गुन्हे दाखल? प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल'

Friday Horoscope : करिअरमध्ये नवी संधी अन् बक्कळ कमाई, 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा शुक्रवारचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT