JEE Mains Result Saam TV
देश विदेश

JEE Main 2024 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

JEE Main 2024 : जेईई मेन २०२४ च्या सत्र- २ चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हा निकाल जाहीर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेईई मेन २०२४ च्या सत्र- २ चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन २०२४ या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यावर्षी ५६ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परिक्षेमध्ये १०० टक्के गुण मिळवले आहे. तुम्ही jeemain.nta.ac.in या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.

जेईई मेन २०२४ च्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा निकाल खूप चांगला लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. ५६ विद्यार्थ्यांनी परिक्षेत १०० गुण मिळवले आहे. तर मागील वर्षी फक्त १३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले होते. यामध्ये दोन मुलींनी १०० गुण मिळवले आहे. कर्नाटकमधील सानवी जैन आणि दिल्लीतील शायना सिन्हा यांनी जेईई मेन परिक्षेत १०० गूण मिळवले आहेत.

जेईई मेन २०२४ सत्र २ ची परिक्षा ४ ते १२ एप्रिल २०२४ रोजी देशभरात झाली होती. याच परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन २०२४ ची कटऑफ 93.23 आहे. (JEE Main 2024 Cut Off)

जेईई मेन २०२४ चा निकाल कसा तपासायचा

  • सर्वप्रथम तुम्ही jeemain.nta.ac.in या वेबसाइटला भेट द्या.

  • यानंतर निकाल विभागात नेव्हिगेट करा. नेव्हिगेशन बारमद्ये JEE Main 2024 Result ची लिंक असेल.

  • यानंतर निकाल पाहण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी.

  • यानंतर पुढे क्लिक करुन माहिती सबमिट करा. माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर JEE Main 2024 चा निकाल पाहायला मिळेल.

  • तु्म्ही हा निकाल डाउनलोड किंवा प्रिंट करु शकता. तसेच वेबसाइटवर परिक्षेची कट ऑफ आणि तुमची रँकदेखील पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT