Lok Sabha Election:'...तर कमीत कमी माझ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहा'; मल्लिकार्जुन खर्गेंचं जनतेला भावनिक आवाहन

Mallikarjun Kharge Emotional Speech: देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. कलबुर्गीतील सभेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेला भावनिक आवाहन केलं आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSaam Tv

देशात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election) वारं वाहत आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना काँग्रेसने कलबुर्गीतून तिकीट दिलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कलबुर्गी जिल्ह्यात पोहोचले होते. येथे त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं (Mallikarjun Kharge Emotional Speech) आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी कलबुर्गीतील सभेत बोलताना म्हणाले की, जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यासाठी काम केलं आहे, तर कमीत कमी माझ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहा. मी राजकारणासाठी जन्माला आलो, असे ते(Mallikarjun Kharge) म्हणाले. मी निवडणूक लढवो अथवा न लढो, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संविधानिक लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करेन, असं त्यांनी म्हटलं आहे.

कलबुर्गीतून भाजपचे विद्यमान खासदार उमेश जाधव यांच्या विरोधात काँग्रेसने (Congress) खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर येथे एका सभेला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, जर जनतेने काँग्रेस उमेदवाराला मत दिलं नाही, तर त्यांना वाटेल की आता कलबुर्गीमध्ये (Kalaburagi) त्यांच्यासाठी (खर्गेंसाठी) जागा नाही.

यावेळी कलबुर्गीतील जनतेला खर्गे म्हणाले की, यावेळी तुम्ही मतदानाला चुकलात तर मला वाटेल की येथे माझ्यासाठी जागा नाही. मी तुमची मने जिंकू शकलो नाही. खर्गे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. तर 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Mallikarjun Kharge
Beed Politics: ' मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन राजकारण कराल, तर...'; आमदार सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा

खर्गे म्हणाले की, भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. त्यांच्यापुढे शरण येण्यासाठी नाही. मी राजकारणासाठी जन्माला आलो, असे ते (Karnataka Politics) म्हणाले. मी निवडणूक नाही लढलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करेन.

मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. ते पुढे म्हणाले की, पदावरून निवृत्ती आहे. पण एखाद्याच्या तत्त्वांपासून निवृत्त होता कामा नये. यावेळी खर्गे यांनी सिद्धरामय्या यांना तत्त्वांचे पालन करण्याचा सल्लाही दिला (Politics News) आहे. कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे २६ एप्रिल आणि ७ मे रोजी मतदान होणार आहे.

Mallikarjun Kharge
Maharashtra Politics 2024 : बच्चू कडूंचा राणांवर प्रहार!; राणांसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com