Maharashtra Politics 2024 : बच्चू कडूंचा राणांवर प्रहार!; राणांसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात

Lok Sabha Election 2024 : अमरावतीत बच्चू कडू विरूद्ध नवनीत राणा असं संघर्ष पेटलाय. बच्चू कडू रवी राणा आणि नवनीत राणांवर चांगलेच संतापलेत. मैदान कोणतंही ठेवा, राणांना उचलून आपटू, असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

अमरावतीत बच्चू कडू विरूद्ध नवनीत राणा असं संघर्ष पेटलाय. बच्चू कडू रवी राणा आणि नवनीत राणांवर चांगलेच संतापलेत. मैदान कोणतंही ठेवा, राणांना उचलून आपटू, असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय. इतकंच नाही तर नौटंकी करणा-या राणांना अमरावतीत पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय. बच्चू कडूंनी अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांचा प्रचार केला. अमरावतीच्या हायव्होल्टेज राजकीय ड्राम्याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.

अमरावतीत सभेच्या मैदानावरून सुरु झालेला राडा आता चांगलाच तापलाय. ज्या मैदानासाठी राडा झाला त्याच मैदानात भाजपचे दिग्गज नेते अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणांसाठी सभा घेतली. तर दुसरीकडे बच्चू कडूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दिनेश बूब यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. मैदान कुठलही ठेवा राणांना उचलून आपटणार असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय.

अमरावतीचं सायन्सकोर मैदान सभेसाठी आरक्षित करूनही बच्चू कडूंना या मैदानात सभा घेता आली नाही.. अमरावतीत दंगल घडू नये म्हणून माघार घेतल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय.. दरम्यान सभेच्या मैदानावरून राडा झाल्यानंतर बच्चू कडू नौटंकी करत असल्याची टीका रवी राणा यांनी केली होती.. यावरून बच्चू कडूंनी राणांवर जोरदार प्रहार केलाय.

Maharashtra Politics 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, मोबदल्यात ठाकरेंना काय मिळणार? समोर आली माहिती

नवनीत राणांसाठी खुद्द अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत. तर मविआचे उमेदवार बळवंत वानखडेंसाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी अमरावतीच्या मैदानात उतरून काँग्रेसच्या हाताला बळ दिलंय. तिसरीकडे दिनेश बूब यांच्यासाठी बच्चू कडू यांनी खास प्रहार स्टायलमध्ये अमरावतीचं मैदान गाजवलंय. त्यामुळे अमरावती लोकसभेच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

बच्चू कडूंनी पोलीस यंत्रणा आणि भाजपला दिलेल्या दणका दिनेश बूब यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, मात्र याच दणक्यामुळे मविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांचीही मत कापली जाऊ शकतात. दुसरीकडे आरक्षित केलेलं मैदान अमित शाहांच्या सभेसाठी ऐनवेळी रद्द केल्यामुळे बच्चू कडूंच्या हाती आयतं कोलीत लागलंय. त्यामुळे बच्चू कडूंचा प्रहार राणा दाम्पत्य कसा झेलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Maharashtra Politics 2024
Pankaja Munde: 'ही शेवटची संधी मला द्या, पाच वर्ष मी घरी बसले, पण तळतळ जीव तुटत होता', पंकजा मुंडेंची मतदारांना भावनिक साद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com