Beed Politics: ' मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन राजकारण कराल, तर...'; आमदार सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा

Maharashtra Lok Sabha Election: मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन उमेदवार निवडून येण्याचा प्रयत्न करीत आहेत, यावरून आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना सक्त ताकीद दिल्याचं दिसत आहे.
Beed Politics
Sunil Shelke Saam Tv
Published On

विनोद जिरे साम टीव्ही, बीड

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (Maharashtra Lok Sabha Election) सुरू आहे. बीडमध्ये देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीर उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. मराठा समाजाचा असतांना, रक्तामासांचा नसतांना मला एका भावाप्रमाणे पंकजाताईंनी सांभाळलंय. मात्र, आज जर कोणी जरांगे पाटलांचं (Manoj Jarange Patil) नाव घेऊन निवडून येण्याचा प्रयत्न करत असेल, तर या निवडणुकीमध्ये त्याला धडा शिकवला जाईल. असं म्हणत आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

यावेळी ते (Sunil Shelke) म्हणाले, की स्वर्गीय मुंडे साहेब असतील. धनु दादा असेल किंवा पंकजाताई असेल, यांनी कधीही जातीपातीचा राजकारण या महाराष्ट्रात केलं नाही. माझ्यासारखा मराठा समाजाचा आमदार होत असताना राजकीय कुठली पार्श्वभूमी नसताना त्यांनी साथ दिली. पंकजाताईंनी रक्ता मांसाचा नसलो तरी एका भावाप्रमाणे सांभाळलं आहे, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं (Beed Politics) आहे.

आज बीड जिल्ह्यामध्ये कोणी जरांगे पाटलांचे नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करू पाहत असेल, तर त्याला कोणी थारा देणार नाही. जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत (Lok Sabha Election) आहेत. समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यांनी कुणाला पाडा आणि कुणाला निवडून आणा ? असं काही सांगितलं नाही. जाणीवपूर्वक काही मंडळी सोशल मीडियावर आयटीसीएलच्या माध्यमातून जे काही राजकारण करू पाहत आहेत. जे कमेंट्स करत आहेत, त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवला जाईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी विश्वास व्यक्त केला (Maharashtra Politics) आहे.

Beed Politics
Maharashtra Politics : CM शिंदेंवरील वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक; डोंबिवलीत आदित्य ठाकरेंच्या प्रतिमेला जोडे मारले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण तापलेलं (Beed News) आहे. प्रचारसभेदरम्यान विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची खेळी खेळताना दिसत आहे.राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आता जरांगे पाटलांचं नाव घेऊन उमेदवार निवडून येण्याचा प्रयत्न करीत आहेत, यावरून आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना सक्त ताकीद दिल्याचं (Lok Sabha Election 2024) दिसत आहे.

Beed Politics
Maharashtra Politics 2024 : ...अबकी बार, तिसरी बार; उत्तर मध्य मुंबईत उमेदवार निश्चित नसताना पूनम महाजन यांची पोस्ट चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com