भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आशिष शेलार, पराग आळवणी यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही तरी पूनम महाजन यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे. मतदारसंघात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. निर्धार विकासाचा...संकल्प विजयाचा..अबकी बार तिसरी बार, फिर एक बार पूनमताईंच खासदार... अशा घोषणांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईसाठी पूनम महाजन यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जातंय आहे?
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून गेली दोन टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, आरपीआय अशा एक ना अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलीये. २०१४ साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेत पोहोचल्या.
मुंबई उत्तर मध्य लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश आहे. त्यापैकी कुर्ला हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
२०१४ ला भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना पक्षाने तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त २ लाख ९१ हजार ७६४ मतं मिळाली होती. तब्बल १ लाख ८६ हजार ७७१ मतांनी महाजन यांनी दत्त याचा पराभव केला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत साली भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार बदलले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ८६ हजार ६७२ मतं मिळाली. तर दत्त यांना ३ लाख ५६ हजार ६६७ मतं मिळाली. २०१४ च्या तुलनेत दत्त यांना ६० हजार मतं जास्त मिळाली होती. तर २०१४ च्या तुलनेत मताधिक्य हे ५० हजारांनी घटलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.