Lok Sabha Elections: अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, या सीटवरून लढवणार निवडणूक

Akhilesh Yadav News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSaam Tv

Akhilesh Yadav News:

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सपाचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनी दिली आहे. अखिलेश यादव यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखही निश्चित झाली आहे.

अखिलेश यादव २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. अखिलेश यादव उद्या दुपारी १२ वाजता कन्नौज लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. समाजवादी पक्षाच्या X सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे.

Akhilesh Yadav
Lok Sabha Election : दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपला, शुक्रवारी होणार मतदान; राहुल गांधीसह या दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला

याआधी माध्यमांशी बोलताना कन्नौजमधून निवडणूक लढवण्याबाबत अखिलेश यादव यांची प्रतिक्रियाही समोर आली होती. अखिलेश यादव म्हणाले होते की, उमेदवारी केव्हा होईल हे आपोआप कळेल. अखिलेश म्हणाले होते की, प्रश्न कन्नौजमधील ऐतिहासिक विजयाचा आहे. इंडिया आघाडी भविष्यात येत आहे, असे जनतेने ठरवले आहे. या निवडणुकीत भाजप इतिहासजमा होईल. मतदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करणार आहे. पीडीए एनडीएचा पराभव करेल, असे अखिलेश यादव म्हणाले.

दरम्यान, कन्नौज लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यात १३ मे रोजी यूपीच्या १३ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. कन्नौज व्यतिरिक्त चौथ्या टप्प्यात शाहजहांपूर, धौराहारा, सीतापूर, हरदोई, मिस्रिख, उन्नाव, फारुखाबाद, इटावा, कानपूर, अकबरपूर आणि बहराइच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

Akhilesh Yadav
Baramati Lok Sabha: सुनेत्रा पवारांसाठी राज ठाकरे मैदानात, बारामतीत ठाकरेंची तोफ धडाडणार

कन्नौज जागेसह सर्व १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. २५ एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. २६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 13 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com