CBSE Board Exam 2024 : शिवजयंती दिनी 'सीबीएसई' ची परिक्षा नकाे, विद्यार्थ्यांना सुटी देण्याची 'मनविसे'ची मागणी

maharashtra navnirman vidyarthi sena latest news : हा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेना त्यादिवशी परीक्षा बंद पाडेल असा इशारा सुर्वे यांनी दिला आहे.
maharashtra navnirman vidyarthi sena demands to cancel 19 feb cbse exam paper
maharashtra navnirman vidyarthi sena demands to cancel 19 feb cbse exam paper saam tv
Published On

Solapur News :

सीबीएसई बोर्डाच्या (cbse board exam 2024) इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (chhatrapati shivaji maharaj jayanti 2024) दिनी संस्कृत विषयाचा पेपर ठेवण्यात आला आहे. शिवजयंती दिनी असलेला पेपर रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (maharashtra navnirman vidyarthi sena) यांच्या माध्यमातून साेलापूर येथील प्रशासनास करण्यात आली आहे. (Maharashtra News)

सीबीएसई बाेर्डाच्या परिक्षेस आजपासून (गुरुवार) देशभरात प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ही परिक्षा सुरु आहे. साम टीव्हीशी बाेलताना साेलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्वे (rahul surve) म्हणाले आजपासून सुरु झालेल्या परिक्षेमधील 19 फेब्रुवारीचा पेपर सीबीएसई बाेर्डाने रद्द करावा.

maharashtra navnirman vidyarthi sena demands to cancel 19 feb cbse exam paper
शिवसेनेचे उद्यापासून कोल्हापुरात महाअधिवेशन, 'स्वाभिमानी' आंदाेलनाच्या तयारीत; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सीबीएसई बोर्डाच्या वेळापत्रकात संस्कृत या विषयाचा पेपर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सुट्टी न देता ठेवला आहे. हा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेना त्यादिवशी परीक्षा बंद पाडेल असा इशारा सुर्वे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मनसे तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनादेण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

maharashtra navnirman vidyarthi sena demands to cancel 19 feb cbse exam paper
Dharashiv : दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये सांगली- कोल्हापुरातील पुराचे पाणी आणणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com