J&K Terrorist Attack Saam Digital
देश विदेश

J&K Terrorist Attack: राजौरीतील शहीद जवानांच्या आठवणी अंगावर शहारा आणणाऱ्या; एकाचं लग्न ठरलेलं, दुसऱ्यासाठी सुरू होता वधूचा शोध

J&K Terrorist Attack: जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

J&K Terrorist Attack

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले. यामध्ये कॅप्टन एमव्ही प्रांजल (बेंगळूरू, कर्नाटक), कॅप्टन शुभम गुप्ता (आगरा, उ. प्रदेश), हवालदार अब्दुल माजिद ( पुंछ, जम्मू-काश्मीर), लांस नायक संजय बिस्ट (उत्तराखंड) आणि पॅराट्रुपर सचिन लौर (अलिगढ, उ. प्रदेश) यांचा समावेश आहे.

गुप्तहेर संस्थेकडून मिळालेल्या माहितीवरून रविवारी राजौरीच्या गुलाबगढ जंगलातील कालाकोट भागात भारतीय सैन्याकडून शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर २२ रोजी भारतीय जवान आणि आतंकवाद्यांमध्ये धमश्चक्री झाली. मात्र महिला आणि लहाम मुलांना वाचवण्यासाठी या पाच जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. यामध्ये लष्कर-ए- तोयबाच्या मुख्य कमांडर देखील समावेश आहे. दरम्यान या चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत.

कॅप्टन एमव्ही प्रांजल

राजौरीमध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांमध्ये कॅप्टन एमव्ही प्रांजल यांचाही समावेश आहे. कॅप्टन प्राजंल ६३ राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती झाले होते. कर्नाटकच्या म्हैसूरचे सुपुत्र कॅप्टन प्रांजल यांना केवळ २८ व्या वर्षी वीरमरण आलं आहे. मंगळूरू रायफल्सचे माजी एमडी वेंकटेश यांचे ते पुत्र. दोनच वर्षांपूर्वी ते बेंगळूरूतील आदिती यांच्याशी विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या काही दिवसआधी त्यांची काश्मीरमध्ये बदली झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कॅप्टन शुभम गुप्ता

आगऱ्याचे कॅप्टन शुभम गुप्ता देखील राजौरीत शहीद झाले. कॅप्टन शुभम गुप्ता यांचे वडील आगरा येथील जिल्हा न्यायालयात सरकारी सल्लागार आहेत. शुभमचे नातेवाईक त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले असतानाच शुभम शहीद झाल्यांची बातमी आली. या बातमीमुळे शुभम यांच्या कुंटुंबियांनी एकच आक्रोश केला. लग्नाच्या तयारीला लागलेले नातेवाईक शोकसागरात बुडाले आहेत.

हवालदार अब्दुल माजिद

हवालदार अब्दुल माजिद पॅरा कमांडो होते. एलओसीनजीक असलेलं अजोटा हे त्यांच गाव. दरम्यान राजौरीमधील हल्ल्यात त्यांनाही वीरमरण आलं. माजिद यांचे भाऊ देखील कश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांना २०१७ मध्ये पुंछमध्ये वीरमरण आलं होतं. माजिद कुंटुंबाची दोन मुलं देशासाठी शहीद झाली आहेत.

लान्स नायक संजय बिष्ट

लान्स नायक संजय बिष्ट यांना राजौरीत वीरमरण आलं. ते १९ कुमांऊ पॅरा कमाडोमध्ये तैनात होते. २०१२ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. रामगढच्या हली गावचे सुपुत्र संजय बिष्ट अविवाहित होते. संजय यांच्या शहीद झाल्याच्या बातमीने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण आहे.

पॅराट्रुपर सचिन लौर

पॅराट्रुपर सचिन लौर काही दिवसातच विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, राजौरीतील जकमकीत ते शहीद झाले. ते एका शेतकरी कुंटुंबातील होते. त्यांना आलेल्या वीरमरणाच्या बातमीने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT