Jammu-Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवाद्यांमध्ये माजी पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश; लेफ्टनंट जनरल यांचा अंदाज

Jammu-Kashmir News : लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत माहिती देताना काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. सीमेपलीकडून भारतात आलेले काही दहशतवादी हे निवृत्त पाकिस्तानी सैनिकही आहेत.
Jammu-Kashmir News
Jammu-Kashmir NewsSaam TV
Published On

Jammu-Kashmir News :

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झालेत. राजौरी परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचाही खात्मा केला आहे.

उत्तरेकडील लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत माहिती देताना काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. सीमेपलीकडून भारतात आलेले काही दहशतवादी हे निवृत्त पाकिस्तानी सैनिकही आहेत. राजोरी आणि पूंछ लगतच्या भागात अजूनही 20 ते 25 दहशतवादी सक्रिय असू शकतात, असा अंदाज द्विवेदी यांनी वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Jammu-Kashmir News
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील खोदकाम थांबवलं, सध्या घटनास्थळी परिस्थिती काय?

लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी म्हटलं की, 'आम्ही चकमकीत आमचे पाच शूर सैनिक गमावले, पण दोन दहशतवाद्यांनाही ठार केले. आपल्या सैनिकांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

खात्मा केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा ढांगरी, कांडी आणि राजोरी येथे निष्पाप नागरिकांच्या हत्येत सहभाग होता. दोन्ही दहशतवादी चांगले प्रशिक्षित होते, त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहशतवाद्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह अनेक देशांमध्ये प्रशिक्षण घेतले असावे. म्हणूनच त्यांना ठार करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. आमचे जवान धैर्याने लढले. राजोरी आणि पुंछ महामार्गांद्वारे देशाच्या इतर भागांशी जोडलेले असल्याने तेथे आणखी दहशतवादी लपून बसण्याची दाट शक्यता आहे, असंही लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी म्हटलं.

Jammu-Kashmir News
China Pneumonia : चीनमध्ये रहस्यमय आजाराचा कहर; जगाची चिंता पुन्हा वाढली, भारताला किती धोका?

गेल्या वर्षी या भागात झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झाला. आम्हाला स्थानिक सूत्रांकडून काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. ढांगरी हल्ल्यातही त्यांचा सहभाग होता. तसेच नियंत्रण रेषा ओलांडून देशात घुसलेल्या काही दहशतवाद्यांची ओळख निवृत्त पाकिस्तानी सैनिक अशी झाली आहे.

पाच जवान शहीद

बुधवारी झालेल्या चकमकीत कॅप्टन एमव्ही प्रांजल (मंगळूर, कर्नाटक), कॅप्टन शुभम गुप्ता (आग्रा, यूपी), हवालदार अब्दुल मजीद (पुंछ, जम्मू आणि काश्मीर), लान्स नाईक संजय बिस्ट (उत्तराखंड) आणि पॅराट्रूपर सचिन लार (अलीगढ, यूपी) शहीद झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com