Pahalgam Terror Attack Saam TV
देश विदेश

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील ३ भावांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

Dombivli Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू. नागपूरच्या रूपचंदानी कुटुंबाचा थोडक्यात बचाव. परिसरात शोककळा.

Namdeo Kumbhar

अभिजित जाधव

Pahalgam Terror Attack Three Cousins from Dombivli Killed : काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. यामध्ये डोंबिवलीमधील तीन मावस भावांचा समावेश आहे. दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात तीन भावांना जीव गमावावा लागल्यामुळे डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. संजय लेले, अथुल माने आणि हेमंत जोशी या तीन मावस भावाचा मृत्यू झालाय.

काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीकर अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली भाग शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी,सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले यांच्यासह डोंबिवली ठाकूरवाडी परिसरात राहणारे अतुल मोने आपल्या कुटुंबीयासह काश्मीर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांना दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी या तिघाना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान हे तिघेही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरल्याचे कळताच नातेवाईकाच्या पायाखालची जमीन सरकली. 

तिघांचेही नातेवाईक तातडीने काश्मीरसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान या तिघांचेही नातेवाईक सुरक्षित असून दहशतवादी हल्ल्यात संजय लेले यांचा मुलगा हर्षद याच्या हाताला गोळी लागल्याने तो वाचल्याची माहिती नातेवाईकांना दूरध्वनीवरून दिली. अतुल मोने रेल्वेमध्ये परेल वर्क शॉप सेक्शन इंजिनियरपदी कार्यरत होते. 

अखेरची ट्रीप ठरली

संजय लेले, अतुल माने आणि हेमंत जोशी हे कुटुंबासह काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. फिरतानाचे फोटो, सेल्फी, व्हिडिओ ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठवत होते. सोशल मीडियावर त्यांनी काश्मीरमधील फिरतानाचे अनेक फोटो पाठवले होते. काश्मीरमधील सौंदर्याची माहिती नातलगांना देत होते. पण ही पर्यटन यात्रा तिघांची अखेरची ठरली.

नागपूरकर कुटुंब थोडक्यात बचावले -

काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी एक नागपूरकर कुटुंब सुद्धा तेथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हे सुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

फ्लॅट मला विका अन्यथा...; घरासमोर लघुशंका, बनियनवर अश्लील चाळे, नाशकात कुटुंबाला नको नको केलं, अखेर मनसेनं... VIDEO

Ellora Cave : वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा, वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलले

Maharashtra Live News Update: माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...

SCROLL FOR NEXT