Jammu Kashmir Encounter Saamtv
देश विदेश

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, एन्काउंटरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी मोठी कारवाई केली आहे. सीमा भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पुंछमधील देगवार सेक्टरमध्ये ही चकमक झाली.

Priya More

Summary -

  • जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला

  • नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते

  • दहशतवादी पाकिस्तानातून भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात होते

  • या चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू असून सुरक्षा दल सतर्क आहे

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये जवानांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुंछमधील सीमा भागात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू - काश्मीर पोलिसांनी संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार गेला. त्यानंतर झालेल्या चकमकीमध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सुरक्षा दलांनी सांगितले की, पुंछच्या देगवार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचालींबद्दल माहिती मिळाली होती. या आधारे जवानांनी तात्काळ परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. ज्याला प्रत्युत्तर म्हणून सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी ठार केलेले दहशतवादी पाकिस्तानातून भारतामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ही चकमक झाली असली तरी परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेश सुरू आहे. आणखी कुणी दहशतवादी या परिसरात लपून बसला आहे की नाही याची खात्री भारतीय जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून केली जात आहे.

दरम्यान, २८ जुलैला ऑपरेशन महादेवद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि २० लाखांचे बक्षीस असलेल्या लष्कर ए तोएबाच्या कमांडर हाशिम मुसाला ठार करण्यात आले. ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय जवानांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्य, सीआरपीएफ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनीही संयुक्त कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT