Tral Encounter Video : 'जैश'च्या दहशतवाद्यांच्या हाती बंदूक, एकाचा तडफडून मृत्यू, त्राल एन्काउंटरचा ड्रोन व्हिडिओ

Jammu Kashmir Encounter Video : जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या एन्काउंटरचे ड्रोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
त्राल एन्काउंटरचे ड्रोन फुटेज
Tral encounter videosaam tv
Published On

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार, शोधमोहीम सुरूच आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोराच्या त्रालमध्ये आज, गुरुवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी एन्काउंटरमध्ये जैश - ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्रालमध्ये अद्यापही गोळीबार सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. दडून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. या एन्काउंटरचा ड्रोन व्हिडिओ आता समोर आला आहे.

त्राल येथे सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत जैश ए मोहम्मद या संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. तर अजून काही जण लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शोधमोहीम सुरूच आहे. त्रालच्या या चकमकीचा ड्रोन व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक दहशतवादी लपून बसल्याचं दिसत आहे. त्याच्या हातात बंदूक असून, तो बाहेरील हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

त्रालमधल्या एन्काउंटरचा आणखी एक ड्रोन व्हिडिओ समोर आला असून, त्यात चकमकीत मारला गेलेला दहशतवादी दिसून येत आहे. या ठिकाणी अजून अनेक दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. तत्पूर्वी, जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे सर्व दहशतवादी त्राल येथील असल्याचे सांगण्यात येते. त्यांची ओळख सुद्धा पटलेली आहे. आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वानी आणि यावर अहमद बट्ट अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

ही चकमक त्राल येथील नादिर गावात सुरू असल्याची माहिती आहे. पुलवामामध्ये मागील ४८ तासांतील ही दुसरी चकमक आहे. याआधी मंगळवारी शोपियां जिल्ह्यात चकमकीत लश्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराला गुप्त माहिती मिळाली होती.

त्राल एन्काउंटरचे ड्रोन फुटेज
Operation Sindoor: भारताच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची संपूर्ण यादी

अवंतीपोराच्या त्राल येथील नादिर गावात दहशतवादी लपून बसल्याचे समजले होते. त्यानुसार, १५ मे रोजी या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी चहूबाजूने परिसराला घेरले. जवानांनी काही संशयित हालचाली टिपल्या. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत जवानांनी गोळीबार करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही मोहीम अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्राल एन्काउंटरचे ड्रोन फुटेज
Indian Army : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com