Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Pahalgam terror attack suspects killed in Srinagar : श्रीनगरमध्ये सोमवारी लष्करानं ऑपरेशन महादेव राबवलं. दहशतवादी लिडवास परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. आतापर्यंत लष्कराच्या जवानांनी तीन संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
operation Mahadev : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये धुमश्चक्री, लष्कराच्या जवानांनी केला ३ दहशतवाद्यांचा खात्मा
Indian Army Commandos in Action During Operation Mahadev in Srinagar’s Harwan Areasaam tv
Published On
Summary
  • श्रीनगरमध्ये लष्कराला मोठं यश

  • ऑपरेशन महादेव लाँच

  • तीन संशयित दहशतवाद्यांचा खात्मा

  • पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची शक्यता

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये हरवानमधील लिडवास परिसरात सोमवारी लष्करानं दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन महादेव राबवलं. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तिन्ही मारले गेलेले दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यातील संशयित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कोरच्या माहितीनुसार, लिडवास परिसरात गोळीबार सुरू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पोलीस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने मुलनारच्या जंगल परिसरात घेराव घातला तसेच शोधमोहीम हाती घेतली. सुरक्षा दलाचे जवान निश्चित झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. शोधमोहीम अद्याप सुरू आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

operation Mahadev : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये धुमश्चक्री, लष्कराच्या जवानांनी केला ३ दहशतवाद्यांचा खात्मा
Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA ची मोठी कारवाई; लष्कर-ए-तोयबाचं कनेक्शन उघड, दोघांना अटक|VIDEO

ऑपरेशन महादेव सुरूच

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरवानच्या मुलनार परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान, काही अंतरावरून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले.

operation Mahadev : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये धुमश्चक्री, लष्कराच्या जवानांनी केला ३ दहशतवाद्यांचा खात्मा
Pahalgam Terrorist Attack: ऑपरेशन सिंदूर; पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com