Pahalgam Terrorist Attack: ऑपरेशन सिंदूर; पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला आता एक महिना पुर्ण झालाय. या महिन्याभरात भारतानं पाकला सळो की पळो करून सोडलयं. आतापर्यंत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकमधील दहशतवाद्यांचा खात्मा कसा करण्यात आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Operation Sindoor
Operation Sindoor
Published On

सुप्रिम म्हसकर, साम प्रतिनिधी

बरोबर, एक महिन्यापूर्वी. संपूर्ण देशाला हादरवणारा पहलगाम हल्ला बैसरन खौऱ्यात घडला. या दहशतवादी हल्ल्यात 25 निष्पाप पर्यटकांना आणि एका स्थानिक काश्मीरी व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले.. धर्म विचारून क्रूर दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या. त्यानंतर संपूर्ण देश दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरला. पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वज्रमुठ आवळली.

पर्यटकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तिन्ही दलांना सर्वाधिकार दिले. पाकमधील दहशतवाद्यांच्या घरात घुसून भारतानं ऑपेऱशन सिंदूर राबवलं. या मिशनमध्ये 22 मिनिटात पाकमधील दहशतवादी तळ उद्धवस्त झाले.

Operation Sindoor
गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला! पाकिस्तानात गृह युद्ध भडकणार? सिधूंच्या पाण्यावरून पाकिस्तान पेटलं

भारताच्या सामरिक शक्तीने पाकच्या क्षेपणास्त्रांना आणि ड्रोन हल्ल्यांना ताकदीनं उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसोबत चीनलाही धडकी भरली. या ऑपरेशनमधून भारतानं संपूर्ण ताकदीनिशी पाकला बेचिराख करण्याची व्यवस्था केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महिन्याभरात काय काय घडलं? पाहूयात.

6 मे 2025

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त

दहशतवादी युसूफ अजहरसह 4 दहशतवाद्यांचा खात्मा

7 मे 2025

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे अड्डे उद्धवस्त

मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जण ठार

दहशतवादी रऊफ अजहरचा भारताच्या मिशनमध्ये खात्मा

8 मे 2025

भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकचे 50 ड्रोन उद्धवस्त

10 मे 2025

भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू

रात्री पुन्हा पाककडून शस्त्रसंधीचे उल्लघंन

12 मे 2025

ऑपरेशन सिंदूरनंतर 'ऑपरेशन केलर'ला सुरुवात

'ऑपरेशन केलर'मध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

13 मे 2025

ऑपरेशन सिंदूरमध्ये 11 सैनिक ठार झाल्याची पाकची कबुली

20 मे 2025

भारताच्या कारवाईत 15 दहशतवाद्यांचा खात्मा

Operation Sindoor
Pahalgam हल्ल्यातील सर्व दहशतवादी ठार? पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांचा बदला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताननं आतापर्यंत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तान घाबरला आणि युद्धविरामाची भीक भारताकडे मागावी लागली. भारतीय सैन्यानं पाकविरोधात ऑपरेशन सिंदूरमधून यशस्वी प्रहार केला. त्यामुळे देशाकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या कुणाचीही आता खैर नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com