गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला! पाकिस्तानात गृह युद्ध भडकणार? सिधूंच्या पाण्यावरून पाकिस्तान पेटलं

India Pakistan संघर्ष तात्पुरता थांबला असला तरी आता पाकिस्तानमध्ये गृह युद्धाला सुरुवात झालीय. या अंतर्गंत यादवीमुळे पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार आहेत. त्यामुळे पाकमध्ये अशी स्थिती का निर्माण झालीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Pakistan Civil War
Pakistan Civil WarSaam Tv Youtube
Published On

सिंध प्रांताच्या मोरो शहरात सध्या अफरातफरी माजली आहे. पाकिस्तान सरकारच्या एका प्रकल्पाविरोधात सिंध प्रांत पेटून उठलाय. सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचा बंगलाच आंदोलकांनी पेटवून दिलाय. आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करत अनेक गाड्याही पेटवून दिल्या. सिंध प्रांतात गृह युद्ध भडकण्यामागे कारण ठरलायं तो पाकिस्तान सरकारचा सिंधू नदीवरील प्रकल्प.

सिंध प्रांतात गृहयुद्ध पेटवणारा पाकिस्तान सरकारचा प्रकल्प काय आहे. पाहूयात.

'सिंधू'च्या पाण्यानं पाकमध्ये गृहयुद्ध

- पाक सरकारचा सिंधू नदीवर 6 कालवे बांधण्याचा प्रकल्प

- पंजाब, सिंध आणि बलूचिस्तानमध्ये कालव्यांची निर्मिती

- कालव्यातून सिंधचे पाणी पंजाब प्रांताकडे वळवले जाणार

- कालव्यामुळे पंजाबमधील 1.9 मिलियन हेक्टर पडीक जमीन शेतीयोग्य होणार

- सिंध प्रांतात आधीपासूनच 40 टक्के पाण्याची कमतरता

- प्रकल्पामुळे सिंधच्या 2.5 मिलियन एकरवरील पिकांचं नुकसान

- यामुळेच सिंधच्या नागरिकांचा पाक सरकारच्या प्रकल्पाला विरोध

Pakistan Civil War
Vaishnavi Hagawane : आधीही विष घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न अन्...; वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

भारत-पाक संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली. त्यानंतर सिंधमधील शेतकऱ्यांना कराराच्या स्थगितीचा सर्वाधिक फटका बसला. अशात पाक सरकार सिंधमधील कृषी क्षेत्राच्या मुळावरच उठलयं. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिध प्रांतातील नागरिकांमध्ये पाक सरकारबाबत असंतोष निर्माण होऊन गृहयुद्धाला सुरुवात झालीय.

Pakistan Civil War
वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

सिंधू नदीवरील सहा कालव्यांचा हा प्रकल्प पंजाब प्रांतासाठी वरदान ठरणार आहे तर सिंधमधील कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसणार. आणि हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानकडून वारंवार बंडाची घोषणा करण्यात येतेय. त्यात आता पाकचा सिंधू नदीवरील प्रकल्प गृहयुद्धाच्या आगीत तेल ओतणारा ठरणार आहे. पाकचं हे भेदभावाचं धोरणच सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तानच्या अतंर्गत यादवीला कारणीभूत ठरणार आहे आणि परिणीती त्याच्य़ा फुटीत होणार हे निश्चित.

Pakistan Civil War
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com