pm modi Saam
देश विदेश

PM Modi: आयफेल टॉवरहून उंच पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; २ वंदे भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा झेंडा

PM Modi's Jammu and Kashmir Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असून, त्यांनी जगातील सर्वात उंच चेनाब रेल्वे पूलाचं उद्घाटन केलं. तसेच २ वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला.

Bhagyashree Kamble

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (६ जून) जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असून, त्यांनी जगातील सर्वात उंच चेनाब रेल्वे पूलाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर त्यांनी भारतातील पहिल्या केबल-स्टेड अंजी पुलालाही भेट देऊन त्याचं उद्घाटन केलं. तसेच श्री माता वैष्णोदेवी कटरा–श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

चेनाब पूल

चेनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात मोठा पूल मानला जात आहे. या रेल्वे पुलामुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. या पुलामुळे जम्मू श्रीनगर दरम्यानचा प्रवास ३ तासांत पूर्ण होणार असून, प्रवाशांची वेळेची बचत होईल.

नदीपात्रापासून तब्बल 359 मीटर उंचीवर असलेला हा पूल 1,315 मीटर लांबीचा असून, तो भूकंप आणि वेगवान वाऱ्यांपासून सुरक्षित राहील, अशा पद्धतीने उभारण्यात आला आहे.

अंजी पूल

अंजी पूल हा भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे, जे कठीण भौगोलिक परिस्थितीत काम करणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणारा आहे. हा पूल जम्मू काश्मीरमधील कटरा आणि रियासीला यांना जोडणारा आहे. उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला दरम्यानचा हा रेल लिंक २९२ किमी लांबीचा असल्याची माहिती आहे. या पुलाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले.

वंदे भारत रेल्वेगाड्यांचे उद्घाटन

पंतप्रधान यांनी दुपारी १२ वाजता, श्री माता वैष्णोदेवी कटरा–श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. या गाड्या स्थानिक नागरिक, पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी फायदेशीर ठरेल.

USBRL प्रकल्प

पंतप्रधान उधमपूर–श्रीनगर–बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा लोकार्पण झाला आहे.

एकूण खर्च: ₹43,780 कोटी

लांबी: 272 किमी

बोगदे: 36 (एकूण लांबी 119 किमी)

पूल: 943

हा प्रकल्प काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी सर्व हवामानात कार्यरत असणाऱ्या रेल्वेंना जोडतो. यामुळे प्रादेशिक गतिशीलता आणि सामाजिक–आर्थिक एकात्मता यांना चालना मिळणार आहे.

रस्ते विकास प्रकल्प

पंतप्रधान मोदींनी सीमावर्ती भागांमधील महत्त्वपूर्ण रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केलं आहे.

राष्ट्रीय महामार्ग-701: रफियाबाद–कुपवाडा रस्ता रुंदीकरण

राष्ट्रीय महामार्ग-444: शोपियां बायपास रस्ता

खर्च: ₹१,९५२ कोटीहून अधिक

तसेच संग्राम जंक्शन (NH-1) व बेमिना जंक्शन (NH-44) येथे उड्डाणपुलांचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रकल्प वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुलभ करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT