Road Accident News x
देश विदेश

Accident News : लग्न सोहळ्याहून परतताना काळाने घात केला, भीषण अपघातात नवविवाहित वधूवरासह ५ जणांचा अंत

Road Accident News : जयपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. कार आणि कंटेनर यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली. भीषण अपघातात वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Yash Shirke

राजस्थानमधील जयपूरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात एका नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जयपूर ग्रामीण भागातील जमवारागडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभानंतर वधू-वर त्यांच्या कुटुंबासह आणि नातेवाईकांसह मध्यप्रदेश येथून परतत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ (दौसा-मनोहरपूर महामार्ग) येथे त्यांची कार समोरुन येणाऱ्या कंटेनरला धडकली. कंटेनर इतक्या वेगाने कारवर आदळला, की कारचा चक्काचूर झाला. गाडीत अनेकजण अडकले. ते मदतीसाठी मोठ्याने ओरडू लागले.

कारला कंटेनरला धडक मारल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. या अपघाताची माहिती मिळताच रायसर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली. कारमध्ये एकूण १४-१५ लोक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

नुकतंच लग्न झालेल्या नवविवाहित दांपत्य त्यांच्या कुटुंबियांसह, नातेवाईकांसह मध्यप्रदेशहून राजस्थानला कारमधून येत होते. तेव्हा त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने जोरात टक्कर मारली. या अपघातात वधू-वरांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमी व्यक्तीने उपचारादरम्यान निम्स रुग्णालयात जीव गमावला, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT