जयपूरमध्ये भरधाव ट्रकने एका कुटुंबाला धडक दिली
अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलांचा जागीच मृत्यू
अपघातामध्ये आई-वडील गंभीर जखमी झाले
पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू
राजस्थानमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. भरधाव ट्रकने अनेकांना चिरडलं. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ३ मुलांचा समावेश आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना श्यामनगर भागामध्ये ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते. मृतदेहाचे तुकडे दूरपर्यंत उडाले होते. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ट्रक दिल्लीवरून अजमेरला जात होता. वाटेवर नवरा बायको आणि त्यांची ३ मुलं गाडीची वाट पाहत होते. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. यावेळी ३ मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये नवरा-बायको गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवरा-बायको आणि ३ मुलं सकाळी रस्त्याच्या कडेला बसून गाडीची वाट पाहत होते. ट्रक इतका वेगात होता की त्याने पाचही जणांना चिरडत निलं. घटनास्थळी रक्ताचे पाट वाहत होते. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर नवरा-बायकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कले.या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.