Shocking : महिलांचे आणि पती पत्नीचे खासगी क्षण रेकॉर्ड, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे बसवले; कारपेंटरचा धक्कादायक प्रकार उघड

Akola Crime News : अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे बसवून महिलांचे खासगी व्हिडीओ तयार करून लैंगिक छळ. कारपेंटर पोलिसांच्या ताब्यात असून डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
Akola Hidden Camera Case: Carpenter Accused of Filming Women
Akola Hidden Camera Case: Carpenter Accused of Filming WomenAi Image
Published On
Summary
  • अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने घरांमध्ये छुपे कॅमेरे बसवल्याचा धक्कादायक प्रकार

  • बेडरूम आणि बाथरूममधील महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड

  • प्राथमिक तपासात चार महिला आणि एका २२ वर्षीय युवतीच्या लैंगिक शोषण केल्याचे उघड

  • पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

अक्षय गवळी, अकोला

अकोला शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभा करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरांमध्ये फर्निचरचे काम करताना बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे बसवून महिलांचे खासगी व्हिडीओ तयार करून लैंगिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी एका कारपेंटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप उसळला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोतीऊर रहेमान शेख असे आरोपीचे नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. अकोल्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीमध्ये मोतीऊरने घरातील कामे करण्याच कॉन्ट्रॅक्ट घेतलं. मात्र त्याच्या डोक्यात सुरु असलेल्या हैवानी कृत्याबाबत रहिवाशांना कधीच संशय आला नाही. अनेक सोसायट्यांमध्ये त्याची कामे सुरु होती. तो ज्या घराची कामे करत होता, त्या प्रत्येक घरात त्याने छुपा कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्यामधून त्याने अनेक महिलांचे खासगी व्हिडीओ तयार केले.

Akola Hidden Camera Case: Carpenter Accused of Filming Women
Shravan Fast : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या व्हिडिओचा गैरफायदा घेत महिलांना धमकवलं. त्यांच्यावर दबाव टाकून लैंगिक छळ करण्यात आले. अकोल्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संबंधित कारपेंटरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीकडील दोन मोबाइल जप्त केले असून, त्यामध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ आढळली आहे. काही व्हिडीओमध्ये पती-पत्नीच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण असल्याची माहितीही मिळत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली.

Akola Hidden Camera Case: Carpenter Accused of Filming Women
Cancer Awareness : दररोज फक्त करा 'हा' एक व्यायाम कॅन्सर तुमच्यापासून राहील दूर; आजपासून करा सुरुवात

प्राथमिक तपासात चार महिला आणि एका २२ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका ३० वर्षीय महिलेने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमधील व्हिडीओ, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. आरोपीने अशाच पद्धतीने आणखी किती महिलांचे व्हिडीओ तयार केले आहेत, तसेच त्यांचा धमकावून किंवा दबाव टाकून छळ केला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. छुप्या कॅमेऱ्यांचा प्रकार समोर आल्यानंतर सोसायटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com