Temple Stampede : श्रावण सोमवारी मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू, १२ गंभीर जखमी

Ashokdham Temple Stampede death Toll : बिहारमधील लखीसरायच्या प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण सोमवारी मोठी दुर्घटना घडली. विजेची तार गर्दीत पडल्याने घबराट आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
Ashokdham Temple Stampede death Toll
Ashokdham Temple Stampede death TollSaam TV
Published On

Ashokdham temple stampede in Lakhisarai Bihar : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण सोमवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत दुर्दैवी घटन घडली आहे. मंदिरात जलाभिषेकासाठी जमलेल्या सुमारे ५० हजार भाविकांच्या गर्दीत अचानक विजेची तार तुटून पडल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ७ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १२ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लखीसराय सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली.

जलाभिषेकासाठी रांगेत उभे असलेल्या गर्दीवर विजेची तार पडल्याने घबराट पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. मंदिरात भाविकांची प्रचंड आणि अनपेक्षित गर्दी जमली होती. सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास एकाच वेळी दोन गाड्या (ट्रेन) आल्याने गर्दीत आणखी भर पडली. आम्ही गर्दीचा अंदाज घेऊन आधीच योग्य ती व्यवस्था केली होती. मात्र, गर्दीच्या अति प्रचंड दाबामुळे एका बाजूचे बॅरिकेडिंग (संरक्षक कठडे) तुटले आणि लोक एकमेकांवर पडू लागले. ही माहिती मिळताच आम्ही तातडीने १० ते १५ जणांना रुग्णालयात हलवले, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिली.

Ashokdham Temple Stampede death Toll
पावसाचा हाहाकार! महाराष्ट्र्रासह अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना झाली त्यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. श्रावण सोमवार असल्याने हजारो भाविक जलाभिषेकासाठी रांगेत उभे होते. त्याच वेळी अचानक विजेची तार पडल्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली. काही जण घाबरून धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या गर्दीत अनेक महिला दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Ashokdham Temple Stampede death Toll
एलपीजीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इतिहासात पहिल्यांदाच कंपन्यांना दिले 'हे' आदेश; सर्वसामान्यांवर काय परिणाम?

घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. जखमींना तात्काळ लखीसराय येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असून प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com