Mumbai-Pune : मुंबई-पुणेकरांनो 'या' पिकनिक स्पॉटवर एकदा जा, पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसते ठिकाण

Shreya Maskar

मुंबई-पुणे

मुळा नदीवरील मुळशी धरणाच्या जलाशयामुळे (बॅकवॉटर) मुळशी तलाव तयार झाला आहे. हा तलाव पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात, ताम्हिणी घाटाजवळ आणि पुणे शहरापासून पश्चिमेकडे साधारणपणे ३५ ते ४० किमी अंतरावर स्थित आहे.

Mumbai-Pune | google

मुळशी तलाव

मुळशी तलाव हा येथील निसर्गरम्य जलाशय, सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांची पार्श्वभूमी आणि पावसाळ्यातील सुट्टीसाठीचे लोकप्रिय ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

Mulshi Lake | google

फोटोग्राफी-कॅम्पिंग

मुळा नदीवरील मुळशी धरणामुळे निर्माण झालेल्या या तलावाकडे मुंबई आणि पुण्यातील पर्यटक फोटोग्राफी, कॅम्पिंग, पक्षीनिरीक्षण आणि निसर्गाच्या शांत सानिध्याचा आनंद घेण्यासाठी येतात.

Photography-Camping | google

पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य

डोंगररांगा गडद हिरव्या रंगाने नटतात आणि विशेषतः ताम्हिणी घाटाच्या परिसरात अनेक धबधबे वाहताना दिसतात.

Nature beauty in monsoon | google

साहसी खेळ

मुळशी तलाव पाहायला गेल्यावर बोटिंग, कायाकिंग आणि तलावाच्या काठावर कॅम्पिंगचा आनंद घेतात.

Adventure game | google

ट्रेकिंगची सोय

कोराईगड आणि धनगड यांसारख्या ऐतिहासिक डोंगरी किल्ल्यांच्या अगदी जवळ मुळशी तलाव हे ठिकाण आहे.

Trekking facility | google

कधा भेट द्यावी?

जुलै ते ऑक्टोबर महिन्यात मुळशी तलावाला भेट द्या. पावसाळ्यात धुक्याने वेढलेल्या नंदनवन पाहायला मिळते.धरणातून ओसंडून वाहणारे पाणी, रस्त्याच्या कडेला कोसळणारे धबधबे, सह्याद्रीच्या दाट हिरव्या टेकड्या आणि धुक्याने व्यापलेली विहंगम दृश्ये पाहण्यासारखी असतात.

When to visit? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

Kasara Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...