Kasara Tourism : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

Shreya Maskar

कसारा

ठाणे जिल्ह्यात, मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा हे पश्चिम घाटाचे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. कसारा घाट ज्याला 'थळ घाट' असेही म्हणतात.

Kasara | google

अशोक धबधबा

अशोक धबधब्याला विहिगाव धबधबा असेही म्हणतात. विहीगाव येथे घाटाच्या सुरुवातीपासून सुमारे ७-८ किमी अंतरावर असलेला हा धबधबा १२० फूट उंचीवरून खाली कोसळतो.

Ashok Waterfall | google

चित्रपटाचे शूटिंग

बॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अशोक धबधबा प्रसिद्ध आहे. हे ठिकाण धबधब्याचा प्रवाह जोरात असताना 'वॉटरफॉल रॅपलिंग'साठीही अत्यंत लोकप्रिय आहे.

Film Shooting | google

कॅमल व्हॅली व्ह्यू-पॉइंट

आग्रा-मुंबई महामार्गालगतच असलेले कॅमल व्हॅली व्ह्यू-पॉइंट हे ठिकाण एका खोल दरीचे विहंगम दृश्य सादर करते. या दरीत पाच नैसर्गिक धबधबे एकाच वेळी कोसळताना दिसतात.

Camel Valley View-Point | google

आनंद मंगल धबधबा

नवीन कसारा घाट मार्गावर असलेला आनंद मंगल धबधबा हा पावसाळ्यात खुलून येतो. गाडी बाजूला थांबवून फोटो काढण्यासाठी आणि उथळ पाण्यात खेळण्यासाठी हे एक सुरक्षित ठिकाण आहे.

Anand Mangal Waterfall | google

भावली धरण

मुख्य शहरापासून सुमारे ३० मिनिटांच्या अंतरावर असलेले हे विशाल धरण 'भाम' नदीवर बांधले गेले असून, येथे तीन टप्प्यांतून खाली येणारा धबधबा पाहायला मिळतो.

Bhavali Dam | google

भावली धबधबा

धरणाचा शांत जलाशय परिसर हा गर्दीपासून दूर, निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही पावसाळ्यात येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Bhavli Waterfall | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : २०० फूट खोल दरी, उंच कातळभिंती अन् अंधारलेली वाट; मुंबईजवळ लपलंय 'हे' रहस्यमय ठिकाण

Mumbai | AI PHOTO
येथे क्लिक करा...