Shreya Maskar
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा/इगतपुरी भागात समरद गावाजवळ वसलेली 'संधान व्हॅली' निसर्गाचा अद्भूत चमत्कार आहे. संधान व्हॅली मुंबईपासून सुमारे १८० किमी आणि पुण्यापासून १६० किमी अंतरावर असून, ती कळसूबाई आणि रतनगड यांसारख्या शिखरांनी वेढलेली आहे.
संधान व्हॅली ही २०० फूट खोल आणि २ किमी लांब अशी दरी आहे. 'व्हॅली ऑफ शॅडोज' (सावल्यांची दरी) म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.
संधान व्हॅली ही सह्याद्री पर्वतरांगेतील पाण्यामुळे तयार झालेली एक नेत्रदीपक दरी आणि 'हँगिंग व्हॅली' (लटकती दरी) म्हणून प्रसिद्ध आहे.
संधान व्हॅलीच्या खडकाळ भिंती काही ठिकाणी इतक्या अरुंद होतात की त्यामधील अंतर केवळ ३ फुटांपर्यंत उरते, ज्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही.
खडतर मार्ग, ज्यासाठी रॉक क्लाइंबिंग आणि खडकाळ भिंतींवरून रॅपेलिंग (दोरीच्या साहाय्याने उतरणे) करावे लागते. परदेशी पर्यटकही येथे येतात.
खडकाळ भिंतींच्या अगदी जवळ, ताऱ्यांनी भरलेल्या स्वच्छ आकाशाखाली रात्रीचा मुक्काम (कॅम्पिंग) करण्याचा अनुभव जणू एक स्वर्ग सुखच आहे.
कळसूबाई , रतनगड आणि भव्य अलंग-मदन-कुलंग (AMK) किल्ले यांसारख्या सह्याद्रीतील प्रसिद्ध शिखरांच्या सान्निध्यात हे ठिकाण आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.