Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला लांब कशाला, मुंबईजवळच वन डे ट्रिप प्लान करा. कोपरजवळ सुंदर पिकनिक स्पॉट्स लपलेले आहेत.
शिल्फाटा येथे भोलेनाथ धबधबा हे सुंदर ठिकाण आहे. जवळच्या टेकड्यांमध्ये वसलेला हा एक हंगामी धबधबा आहे, जो मुसळधार पावसाळ्यात वाहतो.
डोंबिवली/ठाकुर्लीच्या अगदी जवळ कचोरे गावात महादेव टेकड्या हे ठिकाण आहे. जिथे पावसाळ्यात एक छोटी, हिरवीगार पायवाट आणि शांत, उंच ठिकाणची दृश्ये अनुभवायला मिळतात.
पालावाच्या फेज २ मध्ये नदीच्या काठावर रिव्हर फ्रंट पार्क आहे. हिरवीगार सार्वजनिक जागा आहे, जी कुटुंबासोबत निवांत पिकनिक प्लान करू शकता.
ठाण्यातील मानपाडा वन क्षेत्र हे पक्षी निरीक्षणासाठी आणि ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या येऊर वन परिक्षेत्रात येते. येथे हंगामी ओढे, स्थानिक पक्षी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतील.
कल्याणजवळ उल्हास नदीच्या काठावर गणेश घाट वसलेला आहे. येथे आल्हासिक पायवाटा, पावसाळ्याची नयनरम्य दृश्ये आणि लागूनच एक बाग आहे.
ठाणे येथे चिरमा देवी धबधबा आहे. येथे हिरवळीतून जाणारी एक छोटी पायवाट आहे, जी तुम्हाला एका आल्हाददायक नैसर्गिक धबधब्यापर्यंत घेऊन जाते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.