Shreya Maskar
यंदा रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्टला आला आहे. तु्म्ही बहिण-भावांसोबत शुक्रवार, शनिवार , रविवार ट्रिप प्लान करा. मुंबईजवळील लोकेशन आताच नोट करा.
लोणावळ्याजवळ सुंदर पवना तलाव आहे. येथे तलावाकाठी रात्रभर कॅम्पिंग, बार्बेक्यू नाइट्स आणि तारांचे निरीक्षण करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
पावसाळ्यात 'व्हाइट-वॉटर राफ्टिंग' चा आनंद घ्यायचा असेल तर कोलाड बेस्ट ठिकाण आहे. येथे फोटोशूटचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात लोणावळा-खंडाळा येथे धुक्याने वेढलेले हिरवेगार डोंगर, धबधबे आणि रस्त्याकडच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससाठी पाहायला मिळतात. येथे राहण्याची, खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
समुद्रकिनारी तुम्हाला फिरायचे जायचे असेल तर अलिबाग बेस्ट लोकेशन आहे. येथे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.
पुणे जिल्ह्यात असलेले लवासा हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे युरोपियन शैली पाहायला मिळते. हे रंगीबेरंगी इमारती आणि तलावाच्या सुंदर दृश्यांसाठी ओळखले जाते.
डोंगररांगा, धबधबे आणि रात्रीच्या स्वच्छ आकाशाने वेढलेल्या आर्थर लेकच्या (तलावाच्या) काठी शांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.