Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Shreya Maskar

लांजा

लांजा हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले एक तालुका मुख्यालय आहे. पावसाळ्यात येथे नक्की जा.

Lanja | pinterest

सवतकडा धबधबा

सवतकडा धबधबा हा हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Savatkada Falls | google

कशेळी बीच

पावसाळ्यात समुद्रकिनारी फेरफटका मारायचा असेल तर कशेळी बीच भन्नाट लोकेशन आहे. येथे फोटोशूटचा आनंद घ्या. येथे वैशिष्ट्यपूर्ण सपाट 'टेबल पॉइंट' आहे; येथून समुद्राचे विहंगम दृश्य आणि सूर्यास्ताचे सुंदर नजारे पाहता येतात.

Kasheli Beach | google

मार्लेश्वर धबधबा

मार्लेश्वर धबधबा हे कोकणातील संदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे जवळच एक प्राचीन गुहा-मंदिर आहे आणि हिरव्यागार दऱ्यांची विलोभनीय दृश्ये पाहायला मिळतात.

Marleshwar Falls | google

पूर्णगड किल्ला

पूर्णगड हा समुद्रकिनाऱ्यावरील एक ऐतिहासिक किल्ला आहे. जिथे तुम्ही जुन्या तटबंदीवरून फिरू शकता, समुद्राचे सुंदर रुप पाहायला मिळते.

Purnagad Fort | google

खोरनिनको धरण

खोरनिनको धरण हे टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर वसलेला एक शांत जलाशय आहे. गजबजलेल्या शहरांपासून दूर निवांत कौटुंबिक सहलीसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Khorninko Dam | google

कधी जावे?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या ठिकाणांना आवर्जून भेट द्या. येथे जवळच खाण्यापिण्याची, राहण्याची उत्तम सोय आहे.

when to go | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : २६ बुरुज अन् अभेद्य तटबंदी, धाराशिवच्या इतिहासाची पाने उलगडणारा 'हा' किल्ला नक्की पाहा

Dharashiv Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...