Wayanad Landslide 
देश विदेश

Wayanad Landslide: वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्ती येणार; ISROने एका वर्षाआधीच दिले होते संकेत

Wayanad Landslide: इस्रोच्या उपग्रहाने काढलेल्या फोटोमध्ये वायनाड भूस्खलनात मोठ्या प्रमाणावर विनाश दर्शवलाय. सुमारे 86,000 चौरस मीटर जमीन घसरलीय. यामुळे राष्ट्रपती भवनाच्या आकाराच्या पाचपट भूस्खलन झाल्याचं फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे.

Bharat Jadhav

केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झालीय. या नैसर्गिक आपत्तीत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान इस्रोने आपल्या उपग्रहाद्वारे काढलेल्या फोटोमधूनही येथील नुकसान आपण पाहू शकतो. भारतीय उपग्रहाने घेतलेल्या उच्च रिझोल्यूशन प्रतिमा वायनाडमधील भूस्खलनामुळे किती प्रमाणात नुकसान झाले दर्शवत आहे. या भूस्खलनाच्या घटनेत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झालेत. तर अद्यापही एनडीआरएफच्या टीमचे बचावकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत सुमारे 86,000 चौरस मीटर जमीन घसरलीय. इरुवाईफुझा नदीच्या काठावर सुमारे 8 किलोमीटरपर्यंतचा ढिगारा वाहून गेलाय. हे उपग्रहाद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट दिसतंय. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबाद, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा एक भाग त्याचा उच्च रिझोल्यूशन कार्टोसॅट-3 ऑप्टिकल उपग्रह सक्षम RISAT द्वारे हे छायाचित्र काढण्यात आलेत. समुद्रसपाटीपासून 1550 मीटर उंचीवर हे भूस्खलन सुरू झाले. त्याचठिकाणी जुने दरड कोसळल्याचे पुरावे आहेत. इस्रोने तयार केलेल्या 2023 च्या 'लँडस्लाईड ॲटलस ऑफ इंडिया'ने वायनाड क्षेत्राला भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हटलं होतं.

ISRO Wayanad Landslide

इस्रोच्या उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमा वायनाड भूस्खलनात मोठ्या प्रमाणावर विनाश दर्शवत आहेत. सुमारे 86,000 चौरस मीटर जमीन घसरली, त्यामुळे राष्ट्रपती भवनाच्या आकाराच्या पाचपट भूस्खलन झालंय. हा ढिगारा सुमारे 8 किलोमीटर खाली वाहत गेला यात शहरे आणि वस्त्या वाहून गेला. इस्रोने दिलेल्या फोटो हे त्याच ठिकाणचे आहेत. त्याचठिकाणी जुने भूस्खलन झाल्याचे पुरावे असल्याचे इस्रोचे म्हणणे आहे. हे छायाचित्र घेण्यासाठी नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात आल्याचे इस्रोने सांगितले. हे फोटो 31 जुलै 2024 चे आहेत. आजूबाजूला ढिगारा कसा पसरला आहे हे या फोटोमध्ये दिसत आहेत. हे फोटो उच्च रिझोल्यूशन रिसॅट SAR वरून घेतले आहे. माहितीनुसार प्रवाहाची अंदाजे लांबी 8 किमी आहे. क्राउन झोन म्हणजे जुन्या भूस्खलनाचे पुन: सक्रिय होणं आहे.

ISRO

मुख्य भूस्खलन आकार 86,000 चौरस मीटर आहे. ढिगाऱ्यांच्या प्रवाहामुळे इरुवानिफुजा नदीचा प्रवाह रुंद झाला. त्यामुळे नदीचा किनारा फुटला. काठावर असलेली घरे आणि इतर पायाभूत सुविधांचे ढिगाऱ्यांच्या प्रवाहामुळे नुकसान झाले आहे, भूस्खलनाच्या शीर्षस्थानाचे 3D रेंडरिंग दर्शवते की डोंगर उताराचा मोठा भाग प्रभावित झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT