राहुल गांधींचा पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
‘लापता व्होट’ या कॅप्शनसह सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर.
१७ ऑगस्टपासून सासाराम येथे ‘वोटर अधिकार यात्रा’ची सुरुवात.
१ सप्टेंबरला पटना गांधी मैदानात भव्य रॅलीचे आयोजन.
Rahul Gandhi Missing Votes video full details : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'व्होट चोरी'वरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. शनिवारी त्यांनी सोशल मीडियावर 'लापता व्होट' या कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओतून राहुल गांधी यांनी 'आता चोरी नाही, जनता जागृक झाली आहे. चला सर्वांनी व्होट चोरीविरुद्ध आवाज उठवूया आणि आपला हक्क वाचवूया असा संदेश दिला आहे. 1 मिनिट 2 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ ‘लापता लेडीज’ या अलीकडील चित्रपटाच्या शीर्षकापासून प्रेरित आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या X हँडलवर शेअर करत लिहिले, “चोरी-चोरी, चुपके-चुपके... आता पुरे, जनता जागी झाली आहे.” या व्हिडिओद्वारे राहुल गांधी यांनी जनतेला जागरूक करण्याचा संदेश दिला आहे. ही ‘वोटर अधिकार यात्रा’ 17 ऑगस्टपासून सासाराम येथून सुरू होणार असून, 1 सप्टेंबर रोजी पटनातील ऐतिहासिक गांधी मैदानात ‘वोटर अधिकार रॅली’ने याची सांगता होईल. या रॅलीत इंडिया आघाडीतील राष्ट्रीय नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.