Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Upcoming Smartphone: Vivo भारतीय बाजारात नवीन Vivo T4 Pro घेऊन येत आहे. T-सिरीजमधील हा फोन 50MP रियर कॅमेऱ्यासह फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून आकर्षक फीचर्ससह सादर केला जाईल.
दमदार परफॉर्मन्स, 50MP कॅमेरा आणि सोनेरी डिझाइनसह भारतात लवकरच लाँच
Vivo T4 Pro Smartphone
Published On
Summary
  • Vivo T4 Pro भारतात लवकरच लाँच होणार

  • 50MP Sony IMX882 कॅमेरा आणि 1.5K डिस्प्ले मिळणार

  • Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसरसह दमदार परफॉर्मन्स

  • 30 हजार रुपयांखाली किंमत असण्याची शक्यता

विवो लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात आपला नवीन हँडसेट Vivo T4 Pro घेऊन येत आहे. हा फोन कंपनीच्या मिड-रेंज टी-सिरीजमधील नवीनतम मॉडेल असेल आणि तो फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. विवोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या फोनचा अधिकृत टीझर जारी करत लाँचची पुष्टी केली आहे, मात्र लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

कंपनीने स्मार्टफोनच्या मागील डिझाइनचा खुलासा केला असून हा सोनेरी रंगात उपलब्ध होईल. त्यात गोळीच्या आकाराचा रियर कॅमेरा आयलंड आणि 3X पेरिस्कोप झूम क्षमता दिली आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये एआय पॉवर्ड फीचर्स देखील असतील. Vivo T4 Pro मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा डिस्प्ले असेल. हा डिव्हाइस नवीन स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसरवर चालणार असून त्यात 50MP चा Sony IMX882 सेन्सरसह प्रायमरी कॅमेरा मिळेल.

कंपनीचा दावा आहे की या फोनमध्ये दमदार परफॉर्मन्ससोबत उत्तम फोटोग्राफी अनुभव मिळणार आहे. हा हँडसेट Vivo T3 Pro चा उत्तराधिकारी असणार आहे. विवोने ऑगस्ट 2024 मध्ये Vivo T3 Pro सादर केला होता. त्यावेळी या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली होती.

आगामी Vivo T4 Pro ची किंमतही 30 हजार रुपयांखाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन मिड-रेंज स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर Vivo T4 Pro एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Q

Vivo T4 Pro भारतात कधी लाँच होणार?

A

कंपनीने अधिकृत टीझर जाहीर केला आहे, मात्र अचूक लाँच तारीख अजून जाहीर केलेली नाही.

Q

Vivo T4 Pro चे खास फीचर्स कोणते असतील?

A

यात 6.78-इंचाचा 1.5K डिस्प्ले, Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर, 50MP Sony IMX882 कॅमेरा आणि 3X पेरिस्कोप झूम असेल.

Q

या फोनची किंमत किती असू शकते?

A

Vivo T4 Pro ची किंमत 30 हजार रुपयांखाली असण्याची शक्यता आहे.

Q

हा फोन कोणत्या मॉडेलचा उत्तराधिकारी आहे?

A

Vivo T4 Pro हा Vivo T3 Pro चा उत्तराधिकारी आहे, जो ऑगस्ट 2024 मध्ये लाँच झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com