Israeli Attack on Gaza  Social Media
देश विदेश

Israeli Attack on Gaza : भीषण! गाझा पट्टीत शाळा आणि रुग्णालयावर हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू

Israeli Attack News in Marathi : गाझा पट्टी पुन्हा एकदा हादरलं आहे. IDFच्या शाळा आणि रुग्णालयावरील हवाई हल्ल्यात ४७ जणांचा मृत्यू झालाय.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : गाझा पट्टी पुन्हा एकदा हवाई हल्ल्याने हादरली आहे. सातव्या महिन्यात आठव्यांदा मध्य गाजामध्ये एका रुग्णालयावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. एक स्थानिक पत्रकार देखील गंभीर जखमी झाला होता. अशाच प्रकारे मागील २४ तासांत केलेल्या हल्ल्यात ४७ फिलिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.

गाझाच्या दीर अल बलाहमधील अल-अक्सा रुग्णालयात हल्ला झाल्यानंतर लोक भीतीने घाबरून सैरावैर घाबरू लागले. हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. इस्त्रायली सैन्याचं म्हणणं आहे की, स्थलांतरांना आश्रय देणाऱ्या एका छावणीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन फिलिस्तानी नागरिक मारले गेले.

इस्त्रायल सैन्य दलाने पुढे म्हटलं की, 'रुग्णालय परिसरात हमासचे सैनिक लपले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. फिलिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की,'रुग्णालय परिसरात हमासचा कोणताही सैनिक नव्हता. यावेळी रुग्ण आणि शरण आलेले लोक होते. इस्त्रायलने याच लोकांवर हल्ला केला.

फिलिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्त्रायलने शनिवारी दीर अल बलाहबरोबर गाझा पट्टीसहीत इतर भागातही हल्ले केला. या हल्ल्यात ४४ फिलिस्तानी प्राण गमावले. तर ८१ जण जखमी झाले आहेत. इस्त्रायल आणि हमासमध्ये झालेल्या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, गाझा पट्टीत इस्त्रायलमध्ये हल्ले सुरुच आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी इस्त्रायल विमानांमधून गाझा पट्टीत वेगवेगळ्या भागात हवाई हल्ले झाले आपेत. यामध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला होता. तर १२३ जण जखमी झाले होते. न्यूज एजेन्सी रॉयटर्सनुसार, एका शाळेवर हल्ला झाला. त्यात पाच फिलिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. आश्रयांच्या छावणींवर हल्ला करण्यात आला. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : किशनचंद तनवाणी आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार

Malaika Arora: पन्नाशी गाठलेली मलायका अजुनही इतकी फिट कशी?

Winter Care: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Chandrapur News : पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप; भद्रावती येथील प्रकार, पोलिसांनी टाकली धाड

Fortune Powerful people list : फॉर्च्युनच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर, जगातील शक्तिशाली व्यक्ती कोण?

SCROLL FOR NEXT