India-China Disengagement at LAC
India-China Disengagement at LACsaam tv

India-China Disengagement : सीमेवरचं टेन्शन मिटलं, चीनचं सैन्य मागे हटलं; शेजारी देश पुन्हा गस्त घालणार

India-China Disengagement at LAC : भारत आणि चीनच्या सैन्यानं लडाखमधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. आता सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्याकडून गस्त घालण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Published on

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या शांततेचं पर्व सुरू झाल्याचं दिसतंय. भारत आणि चीनच्या सैन्यानंही लडाखमधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. सन २०२० मध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्याआधी चौक्यांवर गस्त घालण्यात येत होती, तेथे आता पुन्हा गस्त ठेवली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता सीमेवर पुन्हा पेट्रोलिंग सुरू होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांचे सैन्य गुरुवारी दिवाळीच्या उत्सवानिमित्त एकमेकांना मिठाई देतील. पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचोक या दोन्ही भागांतून भारत आणि चीनचे सैन्य मागे हटले आहे. दोन्ही सैन्यदलांमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा यापुढील काळातही सुरू राहणार आहे. सध्या तरी तणाव निवळला आहे.

यापूर्वी ज्या प्रमाणे पारंपरिक चौक्यांवर गस्त घालण्यात येत होती, ती आता पुन्हा सुरू होणार आहे. २०२० मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये जोरदार झटापट झाली होती. त्यानंतर तणाव वाढला होता. आता तो तणाव निवळून सीमेवरील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा पूर्ववत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

India-China Disengagement at LAC
America VS China: अमेरिकेचा चीनला मोठा झटका; चिनी वस्तूंच्या आयातीवर १०० टक्क्यांपर्यंत कर लागू

भारताने २०२० मधील घटनेनंतर कठोर कारवाईचं पाऊल उचललं होतं. चिनी कंपन्यांवर निर्बंध घातले होते. तसेच अनेक क्षेत्रांतील गुंतवणूकही बऱ्यापैकी नियंत्रणात आणली होती.

एप्रिल २०२० मध्ये चीनच्या सैन्यानं पूर्व लडाखमधील परिसरात अतिक्रमण करण्याचे प्रयत्न केले होते. त्यावर भारतीय सैन्यदलानं कडाडून विरोध करत आक्षेप नोंदवला होता. त्यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झडप झाली होती. या घटनेत भारतीय सैन्यदलातील २० जवान शहीद झाले होते. यात चिनी सैनिकही मोठ्या संख्येने मारले गेले होते. मात्र, याबद्दलची निश्चित आकडेवारी त्या देशाने जाहीर केली नव्हती.

भारत आणि चीन या दोन देशांमध्ये एक समझोता झाला होता. पूर्व लडाखमध्ये एलएसीवरील काही संवेदनशील ठिकाणांवर गस्त घालण्याबाबत दोन्ही देशांत सहमती झाली होती. यासंबंधीची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली होती. आता दोन्ही देशांच्या सैन्याच्या माघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, तब्बल साडेचार वर्षांपासूनचा तणाव निवळला आहे.

India-China Disengagement at LAC
China- India: दिवाळीत सीमेवर वाढणार गोडवा; चीन सैन्य माघारी फिरलं, मिठाई वाटणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com