China- India: दिवाळीत सीमेवर वाढणार गोडवा; चीन सैन्य माघारी फिरलं, मिठाई वाटणार

LAC वरून एक मोठी अपडेट समोर आलीय. चिनी सैन्याने LAC वरून माघार घेतलीय. दोन्ही सैन्याने डेपसांग आणि डेमचोकमधून माघार घेतलीय.
China- India: दिवाळीत सीमेवर वाढणार गोडवा; चीन सैन्य माघारी फिरलं, मिठाई वाटणार
Published On

भारत आणि चीनमधील लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवरून एक मोठी बातमी आलीय. चिनी सैन्याने LAC वरून माघार घेतलीय. डेपसांग आणि डेमचोकमधून दोन्ही सैन्याने माघार घेतलीय. एलएसीवरील डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण झालीय. आता लोकल कमांडर पातळीवर चर्चा होईल. एलएओसीवर भारत आणि चीनच्या सैन्य लवकरच गस्त सुरू करतील.

रशियाच्या कझानमध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगच्या द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स शिखर परिषदेच्या काळात दोन्ही नेत्यांनी एलएसीवर गस्त घालण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. याप्रकणी चीनने विधान केलंय. चीन आणि भारतीय सैन्याने LAC बाजूने पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याच्या प्रस्तावाची पद्धतशीर अंमलबजावणी केलीय. भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती मिळाली आहे की, दिवाळीनिमित्त दोन्ही देशांचे सैन्य आपापसात मिठाईचे वाटपही करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक सीडीआरएस स्तरावर चर्चा सुरू राहणार आहे. लवकरच गस्त होईल. उद्या मिठाईची देवाणघेवाण होणार आहे. पडताळणी सुरू आहे. ग्राउंड कमांडर्समध्ये गस्त घालण्याच्या पद्धती निश्चित केल्या जातील. ग्राउंड कमांडर म्हणजे ब्रिगेडियर आणि त्याखालील अधिकारी होय.

सीमा विवादाबाबत भारत आणि चीनमध्ये विशेष करार झाला होता. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. एएनआयच्या वृत्तानुसार, भारत आणि चीनने सोमवार आणि मंगळवारपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलएसी) लष्करी माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केलीय. दरम्यान चार वर्षांनंतर दोन्ही देशांमधील लष्करी माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं जयशंकर यांनी म्हटलंय. दोन्ही देशांमधील विश्वास वाढणं आणि इच्छाशक्ती निर्माण होण्यास अजून वेळ लागेल. लदाखच्या सीमेवरील दोन ठिकाणावरून सैन्य माघारी जाणं हे पहिलं पाऊल असल्याचं देखील परराष्ट्र मंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com