इस्राइलने इराणवर मोठा हल्ला केला
तेहरानसह अनेक भागात भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले
इस्राइलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली
इस्राइलने हवाई सीमा बंद करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले
इस्राइलने इराणवर सर्वात मोठा हल्ला केला. इराहणच्या अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. इस्राइलच्या संरक्षणमंत्र्यांनी या हवाई हल्ल्याची माहिती दिली. इराणची राजधानी तेहरानसह अनेक भागांमध्ये स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आले. इराण आणि इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडला असून अनेक ठिकाणी सायरन वाजवण्यात आले आहेत. इस्राइलने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि घराबाहेर पडू नये असे आवाहन केले. इस्राइलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
इस्राइल- अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. इस्राइलने इराणमध्ये ३ मोठे हल्ले केले. तेहरानसह ३० ठिकाणी हे हवाई हल्ले करण्यात आले. इराणमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. तेहरान, मेहराबाद विमानतळावर देखील हल्ला करण्यात आला.
इस्राइलने इराणमधील महत्वाच्या नेत्यांना टार्गेट केले आहे. राष्ट्रपतींच्या घराजवळ हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यानंतर इस्राइलच्या राष्ट्रपतींना तेहरानमधून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. इराणकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
इराणवर हल्ला केल्यानंतर इस्राइलकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इराणवर हल्ला केला असल्याचे इस्राइलने सांगितले. आम्ही हल्ला नसता केला तर इराणने आमच्यावर हल्ला केला असता असे इस्राइलने सांगितले. या हल्ल्यानंतर इस्राइलने आपल्या हवाई सीमा बंद केल्या आहेत. स्वत: इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे.
त्यांनी सांगितले की, 'इस्रायलच्या सैन्यांनी आयडीएफने खबरदारीचा उपाय म्हणून इराणवर हल्ला केला आहे. हल्ल्यापूर्वी इस्रायलने आपल्या देशातील नागरिकांना सतर्क केले होते. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. तेहरानसह अनेक भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले.'
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी असे देखील सांगितले की, 'इस्रायल सरकारने इराणवर हल्ला करण्यापूर्वी आपल्या नागरिकांना सतर्क केले होते. त्यांनी लोकांना त्यांच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवून आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. इस्रायलमधील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि कार्यालये बंद करण्यात आली आहेत. लोकांना घरातच राहण्यास आणि घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.