

इराणमध्ये आर्थिक व सामाजिक असंतोष वाढत असून आंदोलनं तीव्र
अमेरिकेच्या हालचाली आणि रणनीतीवर जगाचं लक्ष
सत्तांतराची शक्यता आणि राजकीय अस्थिरतेवर चर्चा
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच इराणमधील अशांततेने जगाचं लक्ष वेधून घेतलंय. इराणमध्ये आर्थिक संकट आणि सरकारविरोधी भावना तीव्र होत आहे. राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यांवर उतरलेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि 2024 मध्ये निवडून आलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना विरोध होतोय. 1979 च्या इस्लामिक क्रांतीत पदच्युत झालेल्या इराणच्या शेवटच्या शाहचे निर्वासित पुत्र रझा पहलवी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातायेत. रझा पहलवी यांनी नागरिकांना आवाहन करून सरकारला इशारा दिला आहे.
इराणच्या नागरिकांचा संयम आता संपलेला आहे. खामेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडावे. तेहरान मधील रस्त्यांवर जनसागर लोटलेला दिसेल. दरम्यान आंदोलन रोखण्यासाठी इंटरनेटसेवा बंद करण्यात आली असून इराणने आपली हवाई वाहतूकही बंद केली आहे. हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आलीये. दुसरीकडे अमेरिका आंदोलनकर्त्यांची बाजूने असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सरकारला इशारा दिला आहे.
शांततापूर्ण आंदोलन करणा-यांवर गोळीबार केल्यास अमेरिका कठोर कारवाई करेल. दडपशाहीच्या कोणत्याही प्रयत्नाला सहन केले जाणार नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनीही शांततापूर्ण आंदोलन करणा-यांच्या बाजूने उभे राहण्याचे सांगितलं आहे. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
इस्त्रायलने इराणवर जून 2025 मध्ये हल्ला केला होता. हे युद्ध 12 दिवस सुरु होते. अमेरिकेचा पाठींबा असलेल्या इस्त्रायलने आण्विक तळांना लक्ष्य केले होते. आताही अमेरिकेचे इराणमधील जनप्रक्षोभावर बारीक लक्ष आहे. व्हेनेझुएलानंतर इराणमध्ये खोमेनींची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिका आतूर झाली आहे. अमेरीकेच्या बलाढ्य शक्तीपुढे इराण सरकार गुडघे टेकणार की तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देणार याकडे जगाचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.