

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं
भाजपकडून काँग्रेस आणि चव्हाण यांच्यावर तीव्र टीका
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारतीय राजकारणावर परिणाम
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे देशाच्या राजकारण तापलंय. डोनाल्ड ट्रम्प भविष्यात भारतीय पंतप्रधानांसोबत व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षासारखेच करू शकतात का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मात्र त्यावरून राजकारण तापलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं.
मादुरो यांच्याविरुद्ध अमेरिकेने केलेल्या कारवाईवरून जगातील इतर देशांनी निषेध केला. दरम्यान अमेरिकेच्या कारवाईचा संदर्भ देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींबाबत प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या शुल्कावर (टॅरिफ)वर भाष्य करताना केलाय. ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारात व्यत्यय आणण्यासाठी टॅरिफचा वापर केला.
मात्र ट्रम्प यांनी अतिरिक्त ५०% टॅरिफ लादला तरी काही फरक पडणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यानंतर चव्हाण म्हणाले की, मग प्रश्न असा आहे की, व्हेनेझुएलामध्ये घडले तसे भारतातही घडेल का? ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे अपहरण करतील का?" बस त्यांच्या या प्रश्नाने भारतीय राजकारणाचं वातावरण तापलंय.
त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवरील मुलाखतीची क्लिप शेअर करून काँग्रेस नेत्यावर टीका केली आहे. "काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निर्लज्जपणे भारतातील परिस्थितीची तुलना व्हेनेझुएलाशी करत आहेत. 'व्हेनेझुएलात जे घडले ते भारतात घडू शकते का' असे विचारून, काँग्रेस त्यांची भारतविरोधी मानसिकता स्पष्टपणे दाखवत असल्याची टीका भंडारी यांनी केलीय.
एका मुलाखतीत चव्हाण यांनी ही टिप्पणी केली आहे. व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते भारतातही घडू शकते. व्हेनेझुएलामधील संघर्षावरून केंद्र सरकारच्या कथित मौनावर त्यांनी हल्लाबोल केला. व्हेनेझुएलामध्ये जे घडले ते संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या विरुद्ध होतं. त्यांनी पुढे इशारा दिला की अशा कृती जागतिक स्तरावर एक धोकादायक उदाहरण निर्माण करू शकतात. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर निशाणा साधला. सरकार मोठ्या जागतिक संघर्षांवर स्पष्ट भूमिका घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.