

अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर निकोलस मादुरो यांची अटक
मादुरोच्या अटकेविरोधात जगभरात निदर्शने
डोनाल्ड ट्रम्प यांचे आणखी पाच देशांना थेट इशारा
अमेरिकेने लष्करी कारवाई करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून अमेरिकेत आणलं. मादुरोच्या अटकेविरोधात जगभरातील अनेक देशांमध्ये निदर्शने होत आहेत. लोक त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी पाच देशांबद्दल एक कडक विधान केले आहे. त्यांना थेट इशारा दिलाय त्यामुळे व्हेनेझुएलानंतर ट्रम्प यांच्या निशाण्यावर अजून पाच देश आहेत अशी चर्चा सुरू झालीय.
मेक्सिको, इराण, कोलंबिया, क्युबा आणि ग्रीनलँड हे देश ट्रम्प यांच्या टार्गेटवर असल्याचं म्हटलं जात आहे. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जगाला उघडपणे धमक्या देत आहेत. ट्रम्प यांनी एकामागून एक अनेक देशांना उघड धमक्या दिल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर आणि ड्रग्जच्या मुद्द्यावर मेक्सिकन लोकांवर बऱ्याच वेळा टीका केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या शेजारील देश मेक्सिकोला इशारा देणारे निवेदन जारी केलंय. "मेक्सिकोला आपली परिस्थिती सुधारावी लागेल कारण मेक्सिकोमधून ड्रग्ज येत आहेत आणि आपल्याला काहीतरी करावे लागेल." असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.
ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांना एक अद्भुत व्यक्ती म्हणालेत. "जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोललो, मेक्सिकोमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची ऑफर दिली, तेव्हा त्यांनी सांगितले की मेक्सिकन सरकार हा मुद्दा हाताळण्यास सक्षम आहे. पण दुर्दैवाने, मेक्सिकोमध्ये कार्टेल खूप मजबूत आहेत. आवडो किंवा न आवडो, ते कार्टेल मेक्सिको चालवत आहेत."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही क्युबाबाबत एक मोठे विधान केलंय. "क्युबामधील सरकार पडण्यास अमेरिका तयार आहे. व्हेनेझुएलानंतर क्युबा संपलाय." "त्याचे कोणतेही उत्पन्न शिल्लक नाही, त्यामुळे क्यूबन सरकार कोसळणारच आहे. त्यांना त्यांचे सर्व उत्पन्न व्हेनेझुएलातून, व्हेनेझुएलाच्या तेलातून मिळत असे. आता त्यांना ते काहीच मिळत नाही आणि क्यूबा पडण्यास तयार आहे." क्युबा हा दीर्घकाळापासून अमेरिकेचा शत्रू आहे.
व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईत मोठ्या संख्येने क्युबन लष्करी अधिकारी मारले गेलेत. क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल व्हेनेझुएलावरील हल्ल्याबद्दल आणि निकोलस मादुरोच्या अटकेच्या कारवाईवरून अमेरिका आणि ट्रम्प यांच्यावर सतत टीका करत आहेत. दरम्यान १९६० पासून अमेरिकेने क्युबाविरुद्ध मोठा व्यापार निर्बंध लादलेत.
व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक झालेत. क्युबा, मेक्सिकोप्रमाणे ग्रीनलँडदेखील इशारा दिलाय. डेन्मार्कमधील स्वायत्त प्रदेश असलेल्या ग्रीनलँडच्या विलीनीकरणाची मागणी त्यांनी केली आहे. "राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्याला ग्रीनलँडची आवश्यकता आहे. ते खूप सामरिक आहे आणि सध्या ग्रीनलँड रशियन आणि चिनी जहाजांनी वेढलेले आहे. ग्रीनलँडभोवती रशिया आणि चीनचा खूप प्रभाव आहे." ट्रम्पच्या विधानामुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे.
"राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्याला ग्रीनलँडची आवश्यकता आहे. ते खूप सामरिक आहे आणि सध्या ग्रीनलँड रशियन आणि चिनी जहाजांनी वेढलेले आहे. ग्रीनलँडभोवती रशिया आणि चीनचा खूप प्रभाव आहे. असं ट्रम्प म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्क साम्राज्यातील एक स्वायत्त देश आहे. त्याची लोकसंख्या फक्त ५७,००० आहे.
हा देश लष्करी संरक्षणासाठी, लोह, युरेनियम आणि जस्त यांसारख्या दुर्मिळ खनिजांचे मोठे साठे आहेत. संभाव्य नवीन शिपिंग मार्गांसाठी (नॉर्थवेस्ट पॅसेज) महत्त्वाचा देश आहे. ग्रीनलँड हे नाटोचे सदस्य राष्ट्र आहे. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडला जोडण्याची धमकी देणं बंद करावं असं सांगितले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका लॅटिन अमेरिकन देश कोलंबियालाही इशारा दिलाय. कोलंबिया आणि व्हेनेझुएला हे दोन्ही देश खूप आजारी आहेत. "बोगोटा (कोलंबियाची राजधानी) येथील सरकार एका आजारी माणूस चालवत आहे, त्याला कोकेन बनवून अमेरिकेला विकायला आवडते. पण हे ते जास्त काळ करू शकणार नाहीत, असं ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणालेत.
ट्रम्प हे कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा उल्लेख करत होते, जे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रमुख टीकाकार होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावर ड्रग्स कारखाने चालवत असल्याचा आरोप बऱ्याचवेळा केला आहे. ट्रम्प यांचे आरोप कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी फेटाळून लावले आहेत.
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. पोलिस कारवाईत असंख्य लोकांचा मृत्यू झालाय. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलविरोधात निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. "आम्ही त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर त्यांनी पूर्वीसारखे लोकांना मारायला सुरुवात केली तर अमेरिका त्यांना खूप मोठा धक्का देईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.