व्हेनेझुएलावर हल्ला, भारताला फटका? भारत-व्हेनेझुएला व्यापारावर परिणाम?

Venezuela Under Fire: अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामुळे भारताला नेमका कसा फटका बसणार आहे? भारत- व्हेनेझुएला व्यापारावर या संघर्षाचा नेमका काय परिणाम होणार?
Impact of Venezuela oil crisis on India
Impact of Venezuela oil crisis on IndiaSaam Tv
Published On

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलयं... एकीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलामधील सत्ता उलथवून लावली तर दुसरीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधही लादलेत..ज्यात व्हेनेझुएलातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर बंदी घालण्यात आलीय...अशातच भारत आणि व्हेनेझुएलातील व्यापारावर नेमकं काय परिणाम होऊ शकतो?

व्हेनेझुएलावर हल्ला, भारताला फटका?

भारताकडून व्हेनेझुएलाला लस, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामग्री, कापूस, रसायनांची निर्यात

व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल, पेट्रोलियम कोक, सेंद्रिय रसायनांची भारताला आयात

2024 मध्ये भारतानं व्हेनेझुएलाकडून अंदाजे 36.20 दशलक्ष डॉलरचे अॅल्युमिनियम आयात केलं

2024 मध्ये व्हेनेझुएला येथून अंदाजे 22 दशलक्ष बॅरल तेल भारतात आयात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल काही डॉलर्सने वाढू शकतात.

भारताकडून व्हेनेझुएलाला होणारी औषधे आणि कपड्यांच्या निर्यातीतही घट

अमेरिकेच्या हल्ल्यामुळे भारत आणि व्हेनेझुएलातील निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबू शकते

भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील व्यापार तेलाभोवती फिरत असताना,भारताची व्हेनेझुएलाला होणारी निर्यात देशाच्या आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील संघर्ष थांबणं केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com