Israel-Hamas War Saam Digital
देश विदेश

Israel-Hamas War : इस्राइलकडून गाझामधील निर्वासित शिबिरावर हवाई हल्ला; स्फोटात 50 हून अधिक नागरिक ठार

Israel-Hamas War Update : हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले करत आहेत.

प्रविण वाकचौरे

Israel-Hamas War :

इस्रायल आणि हमास यांच्यात मागील अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धात इस्रायल हमासबरोबरच दहशतवादी संघटना हिजबुल्लाहशीही लढत आहे.

हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले करत आहेत. इस्रायलही प्रत्युत्तर देत हल्ले करत आहे. दरम्यान, इस्रायलने शनिवारी रात्री गाझामध्ये हवाई हल्ला केला, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात निर्वासित शिबिरात राहणारे किमान ५१ पॅलेस्टिनी ठार झाले. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले होती. सोबतच गाझा पट्टीतील अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. मोठमोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या आहेत. गाझामध्ये इस्रायलच्या हवाई दलासह भूदलही तैनात आहे.

हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. शनिवारी 231 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 9488 पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यात 3900 मुले आणि 2509 महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. वेस्ट बँक परिसरात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात किमान 140 लोकांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा दिला आहे की, जर त्यांना जीव वाचवायचा असेल थर त्यांनी तातडीने गाझाच्या दक्षिणेकडील भागाकडे जावे. आयडीएफने म्हटले आहे की पॅलेस्टिनींना इस्राईलच्या वेळेनुसार शनिवारी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सलाह अल-दिन रस्ता वापरण्याची मुभा दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

Leopard Attack : धक्कदायक! अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, जबड्यात पकडलं अन्...

Winter Hairfall : हिवाळ्यात केस लवकर का गळतात? जाणून घ्या कारण

अजित पवार गटाकडून काँग्रेसला जबरी धक्का; ज्येष्ठ नेत्याचा रामराम, ४० वर्षांची सोडली साथ

Breast cancer screening: ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी फक्त मॅमोग्राफी पुरेशी नाही? डॉक्टरांनी सांगितली दुसरी पद्धत

SCROLL FOR NEXT