इराणमध्ये १६ दिवसांपासून सरकारविरोधात आंदोलन सुरू
१०० हून अधिक शहरांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण
हिंसाचारात आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला
१०,६०० पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली
इराणमधील जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. सरकारविरोधात गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन सुरू हेत. २८ डिसेंबरपासून सुरू झालेले आंदोलन आता देशभरातील अनेक शहरांमध्ये देखील सुरू झाले आहे. त्यामुळे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजधानी तेहरानसह देशभरातील १०० हून अधिक शहरांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला. तर १०,६०० जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारने या हिंसाचारासाठी मोसाद आणि परदेशी शक्तींना जबाबदार धरले.
इराणमध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकट आणि कडक धार्मिक नियमांमुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतर आंदोलन करत आहेत. या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की इराणमधील अनेक शहरांमध्ये जाळपोळ, गोळीबाराच्या घटना घडत आहेत. अनेक शहरांमध्ये वीज पुरठवा खंडित करण्यात आला आहे.
इराण सरकारने या निदर्शनांसाठी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि परदेशी शक्तींना जबाबदार धरले आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५३८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४९० आंदोलनकर्ते आणि ४८ सुरक्षा कर्मचारी आहेत. १०,६०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मानवाधिकार संघटनांचा आरोप आहे की सुरक्षा दलांनी अनेक भागात गोळीबार केला. तर सरकार हिंसाचारासाठी आंदोलनकर्त्यांना जबाबदार धरत आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आंदोलनकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांना मारले जात आहे आणि काही सुरक्षा कर्मचाऱ्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. अराघची यांनी या घटनांसाठी इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला जबाबदार धरले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोलिस हल्ल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला. सरकारचा दावा आहे की, आंदोलनात आता शांतता राहिली नाही तर त्याला हिंसक वळण आले आहे. तर आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, अनेक शहरांमध्ये सुरक्षा दल गर्दी पांगवण्यासाठी थेट गोळीबार करत आहेत. सरकारने दावा केला आहे की, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.