

इथेनॉल कारखान्यावरून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने हिंसक रूप घेतलं.
तिब्बी शहरात इंटरनेट सेवा बंद
पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये थेट संघर्ष झाल्यानं परिस्थिती तणावपूर्ण.
राजस्थानमधील हनुमानगडमध्ये आशियातील सर्वात मोठ्या इथेनॉल कारखान्यावरून गोंधळ सुरू झालाय. पोलीस कर्माचारी आणि शेतकरी आमनेसामने आलेत. हनुमानगडमध्ये होत असलेल्या शेतकरी आंदोलनात हिंसाचार उसळलाय. गेल्या २४ तासांपासून तिब्बी शहर आणि आसपासच्या गावांमध्ये इंटरनेट बंद आहे.
हिसांचारामुळे कलम १६३ लागू करण्यात आलाय. तिब्बी शहर आणि इतर गावांमधील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि दुकाने बंद आहेत. संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. शेतकरी आणि पोलिसांमधील संघर्षात सुमारे ७० शेतकरी जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. यात काँग्रेस आमदार अभिमन्यू पूनिया यांच्या डोक्याला दुखापत झालीय.
पोलिसांच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी १८ पोलिसांच्या गाड्या जाळल्या. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कारखान्याची भिंत तोडत त्यांनी कारखान्यात प्रवेश केला. दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. संतप्त शेतकऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले. कारखान्याजवळ राहणारी सुमारे ३० कुटुंबं तेथून पळून गेली आहेत.
हनुमानगडचे जिल्हाधिकारी डॉ. खुशाल यादव यांनी सांगितलं की, आशियातील सर्वात मोठा इथेनॉल कारखाना, ड्यून इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड, हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी येथील राठीखेडा गावात उभारला जातोय. यासाठी, २०२२ मध्ये "रायझिंग राजस्थान" उपक्रमादरम्यान ४५० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. २०२३ मध्ये जमिनीची नोंदणी करण्यात आल्या.
त्यानंतर जमिनीच्या वापरात बदल करण्याची परवानगी देण्यात आली. इततकेच नाही तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेण्यात आलीय. यासह सरकारी औपचारिकता देखील पूर्ण करण्यात आल्या आहेत. परंतु शेतकरी या फॅक्टरीचा विरोध करत आहेत. परंतु शेतकरी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत विकसित होणाऱ्या या प्रकल्पाला विरोध करताहेत.
कारण या फॅक्टरीमुळे भूजल प्रदूषित होईल तसेच वायू प्रदूषण वाढवेल असे म्हणत शेतकऱ्यांनी विरोध सुरू केलाय. दरम्यान फॅक्टरीमुळे जमीन नापीक होऊ शकते. लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. इतकेच नाहीत कारखान्याला पर्यावरणीय मंजुरी मिळालेली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरी आणि सार्वजनिक संमतीशिवाय कारखाना बांधू देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.