Farm Road: नवीन शेतरस्ता हवा? कसा कराल अर्ज, कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

Farm Road Disputes : शेतकरी जमीन महसूल कायद्यांतर्गत नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करू शकतात. यासाठी तहसीलदारांकडे कसा अर्ज करावा हे जाणून घेऊ. यासाठी कोणती कागदपत्रे हवेत ते जाणून घ्या.
Farm Road Disputes :
Farmers inspecting a proposed farm road route for smooth access to agricultural land.saam tv
Published On
Summary
  • शेत रस्त्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो.

  • शेतकऱ्यांसाठी नवीन शेतरस्त्याची कायदेशीर तरतूद उपलब्ध.

  • शेत रस्त्यावरील वाद कायदेशीर पद्धतीने सोडवता येतात.

शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेतमाल वाहतूक, पाणीपुरवठा, शेतीची देखभाल आणि आपत्कालीन परिस्थितीत शेतात जलद पोहोचण्यासाठी रस्ता चांगला असणं आवश्यक असतं. बऱ्याचवेळा शेतरस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वाद होत असतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात शेतकऱ्यांसाठी नवीन शेतरस्ता मिळवून देण्याची तरतूद करण्यात आलीय. त्यानुसार तहसीलदारांकडे अर्ज करत शेतकरी आपल्या जमिनीपर्यंत रस्ता मिळवण्याची मागणी करू शकतात.

Farm Road Disputes :
Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

आवश्यक कागदपत्रे कोणती?

जर शेतकरी आपल्या शेताला नवीन रस्ता देण्याची मागणी करत असतील, तर त्यासाठी तहसीलदार कार्यालयात योग्य स्वरूपात अर्ज करावा लागेल. यात अर्जदाराची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. जसं की,

अर्जदाराचे नाव, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर , तसेच ज्या शेतासाठी रस्ता हवा आहे त्या जमिनीचा गट क्रमांक, सर्वे क्रमांक, हद्दीचे तपशील यांचा उल्लेख या अर्जात असावा. रस्ता कोणत्या दिशेने हवा आहे, कोणत्या बांधावरून हवा आहे, याचा कच्चा नकाशा जोडणे आवश्यक आहे.

Farm Road Disputes :
Kul Kayda: मालक झालेल्या कुळांच्या शेतजमिनीची विक्री करता येते का? काय आहे कुळ कायदा?

शेतजमिनीचा भूमी अभिलेख विभागाकडील शासकीय मोजणी नकाशा जोडावा. यासह 7/12 उतारा द्यावा.

अर्जदाराच्या शेतजमिनीचा चालू वर्षातील 7/12 उतारा सादर करावा. लगतच्या शेतकऱ्यांची संमती

रस्ता ज्या जमिनीच्या सीमेला किंवा बांधावरून जाणार आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची संमतीपत्रे आणि पत्ते आवश्यक आहेत.

जर समजा संबंधित जमिनीबाबत कोणताही वाद न्यायालयात प्रलंबित असेल तर त्याची माहिती आणि संबंधित कागदपत्रे देखील अर्जासोबत द्यावीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरत असलेला जुना रस्ता अडवला जातो, अशावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी अर्ज करता येतो.

पुढील कागदपत्रे आवश्यक

चालू वर्षातील 7/12 उतारा दाखला

तीन महिन्याच्या आतील तयार केलेला मोजणी नकाशा

अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्यामध्ये रस्ता अडवलेल्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ते नमूद करणे आवश्यक. रस्त्यावरील अडथळे, बांधकाम किंवा तटबंदीचे फोटो आणि कच्चा नकाशा जोडावा.

ज्या शेतजमिनीवर काही वाद सुरू असेल आणि न्यायालयाने स्थगिती आदेश किंवा जैसे थे आदेश दिला असल्यास, त्याची प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com