Diesel Price Hike Saam Tv
देश विदेश

Diesel Price Hike: इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; पेट्रोलनंतर 'या' डिझेलच्या दरात मोठी वाढ

Impact Of Iran Israel War On Diesel Prices In India: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात औद्योगिक डिझेलच्या दरात तब्बल ₹22 ची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत असून उद्योग आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

Omkar Sonawane

इराण अमेरिका-इस्रायल यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला आता तिसरा आठवडा सुरू झाला असून, ते संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. इराण युद्धाची अनेक भीषण छायाचित्रे सोशल मीडियावर समोर येत आहेत. या संघर्षादरम्यान मध्य-पूर्वेकडील देशांमधील इंधन प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे आता जागतिक ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. इराण युद्धाचे परिणाम भारतातही जाणवत आहेत. एलपीजीच्या संकटानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे.

औद्योगिक डिझेलच्या दरात मोठी वाढ

प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹2 पेक्षा जास्त दरवाढ केल्यानंतर, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) आता औद्योगिक डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ केली आहे. प्रति लिटर ₹22 च्या या प्रचंड दरवाढीमुळे देशाच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक डिझेलच्या किमती प्रति लिटर ₹87.67 वरून ₹109.59 पर्यंत वाढून विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधा यांसारखी क्षेत्रे, जिथे डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसेल.

औद्योगिक डिझेलच्या दरवाढीचा परिणाम दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर इराण युद्ध लवकर संपले नाही, तर भारतातील महागाई सर्वसामान्यांसाठी विनाशकारी ठरू शकते आणि त्याचा भार थेट ग्राहकांवर पडेल. ही दरवाढ अशा वेळी झाली आहे. जेव्हा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत. ऊर्जा खर्चाचा हा नवीन भार उद्योगांच्या खिशाला कात्री लावणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT