भाजपच्या दिग्गज नेत्याला महिलेने चप्पलेनं चोपलं, राजकीय वर्तुळात खळबळ

Woman Beats BJP Corporator With Slipper: भाजप नगरसेवकावर महिलेने चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. एलआयसीच्या पैशांवरून वाद झाल्याचा आरोप असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Woman confronts BJP corporator inside party office, leading to dramatic slipper assault over alleged financial dispute.
Woman confronts BJP corporator inside party office, leading to dramatic slipper assault over alleged financial dispute.Saam Tv
Published On

भाजपच्या नगरसेवकावर काही अज्ञात व्यक्तीनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बुधवारी 18 मार्च रोजी भाजपच्या कार्यालयात नवनियुक्त अध्यक्ष आणि नगरसेवकांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी एक महिला आणि एक पुरुष आत शिरले. त्यांनी नगरसेवक बिजेंद्र श्रीवास्तव यांच्यावर हल्ला केला. इतकेच नाही तर त्या महिलेने चप्पल काढत भाजप नगरसेवकाला बेदम मारले.

bjp news
bjp newssaam tv

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश येथील महारगंजमध्ये पक्षाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान सुधांशू वर्मा आणि निर्मला वर्मा यांनी अचानक भाजप कार्यालयात प्रवेश केला आणि चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. निर्मला वर्माने नगरसेवक बिजेंद्रची कॉलर पकडली आणि त्याला चपलेने मारायला सुरुवात केली. तर महिलेच्या सोबत असलेल्या सुधांशु वर्माने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी उपस्थितांनी हस्तक्षेप करून परिस्थिति शांत केली. बिजेंद्र यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात सुधांशु वर्माने त्याच्या मोबाईलवरून शिवीगाळ केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर नगरसेवकाने सरकारकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

Woman confronts BJP corporator inside party office, leading to dramatic slipper assault over alleged financial dispute.
Special Report : Pune Murder News | वाढदिवसाला गिफ्ट दिलं नाही म्हणून केली पतीची हत्या

महिलेचा आरोप आहे की, तिने LIC च्या नावे सुमारे साडेचार लाख रुपये जमा केले होते. परंतु या नगरसेवकाने ते पैसे एलआयसी कार्यालयात जमा केले नाहीत. ती या रकमेच्या परताव्याची मागणी करत होती. यामुळे निराश होऊन, ती महिला आपल्या मुलासोबत कार्यक्रमात आली. त्या महिलेने कार्यक्रमात गोंधळ घालत जोरदार राडा केला. तिने त्याला एक चापट मारली आणि त्याची कॉलर पकडून त्याला बाहेर ओढू लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com