Missile strikes and explosions reported across multiple Iranian cities as the Iran-Israel conflict enters its third day with rising civilian casualties. Saam Tv
देश विदेश

इराण इस्रायल युद्धात मोठी जीवितहानी, 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

Iran Israel War Civilian Death Toll Latest Update: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा तिसरा दिवस अधिक भीषण ठरत असून इराणमध्ये ५५५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. मागच्या दोन दिवसांपासून मध्य पूर्वेमध्ये तीनही देश एकमेकांवर क्षेपणास्त्राचा हल्ला करता आहे. इस्रायल आणि अमेरिकेने कालपासून सौदी अरब देशांवर देखील हल्ले करायला सुरुवात केली आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर ही मोठा परिणाम झाला आहे. आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये आतापर्यंत 555 लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि 130 पेक्षा जास्त शहरांवर हल्ले केले आहेत. तर इस्रायलमधील 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कुवेत या शहरामध्ये अमेरिकन दूतावास राहत असलेल्या ठिकाणी जोरदार हल्ले केले. अमेरिकेने तेथील नागरिकांना आहे त्या ठिकाणी राहण्याचे आवाहन केल्यानंतर काही वेळातच इराणने त्याच ठिकाणी क्षेपणास्त्र डागले. मात्र यामध्ये किती जीवितहानी झाली याबाबत माहिती समोर आली नाहीये.

दरम्यान अमेरिकेचे आणि इस्रायलचे हल्ले सुरू असताना इराणचे सुरक्षा अधिकारी लारीजानी यांनी एक्सवर ट्विट करत शपथ घेतली की आता आम्ही अमेरिकेसोबत कुठलीही चर्चा करणार नाही.

आतापर्यंत इराणच्या 555 लोकांचा मृत्यू

अल जझीराच्या वृत्तानुसार, इराणी रेड क्रेसेंट सोसायटीने म्हटले आहे की अमेरिका-इस्रायलच्या देशभरातील हल्ल्यांमध्ये किमान ५५५ लोक मारले गेले आहेत. सायबर सुरक्षा वॉचडॉग नेटब्लॉक्सने म्हटले आहे की अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान इराणमधील इंटरनेट ४८ तासांपासून बंद केले असून आजचा हा युद्धाचा तिसरा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पुण्यात आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं

Monsoon Update : मान्सून अडखळला! संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

Shocking News: आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

370 Biryani Controversy: 'व्यक्ती बदलतात, वाद बदलतात, पण प्रेक्षक...'; 370 बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरनं नेटकऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT