एकाचवेळी 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस प्रशासनात खळबळ, दोन जिल्ह्यांना नवे SP, कोणाची कुठे नियुक्ती?

8 IPS officers transfer list November 2026पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एकाचवेळी 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, एका OPS अधिकाऱ्यालाही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
ODISHA POLICE RESHUFFLE 2026
ODISHA POLICE RESHUFFLE 2026saam tv
Published On: 

ओडिशाच्या पोलिस विभागात मोठे खांदेपालट करण्यात आले आहे. एकाचवेळी 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून एका OPS अधिकाऱ्यालाही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. गृह विभागाच्या OSD पदावरही बदल करण्यात आला आहे. तसेच दोन जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. या बदल्यांचे आदेश गृह विभागाने 1 नोव्हेंबर रोजी जारी केले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नवीन पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ODISHA POLICE RESHUFFLE 2026
12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती ? वाचा यादी

सुशांत कुमार नाथ यांची गृह विभागाच्या OSD पदी नियुक्ती

IPS अधिकारी सुशांत कुमार नाथ यांची गृह विभागाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते कारागृह आणि सुधारात्मक सेवा विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान सराह शर्मा यांची दक्षता विभागाच्या DIG पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमिताभ ठाकूर यांच्याकडे कटक येथील परिवहन आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) पदाचा अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.

ODISHA POLICE RESHUFFLE 2026
14 पोलीस आयुक्तांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

राजेश कुमार यांच्याकडे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), एसएपी, भुवनेश्वर या पदासोबतच गृह विभागाच्या विशेष सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर डॉ संतोष बाला, संचालक एसएफएसएल यांच्याकडे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि संचालक, सुधारात्मक सेवा या पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

ODISHA POLICE RESHUFFLE 2026
कॅबिनेट संपताच 5 IAS आणि 4 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

झारसुगुडा येथील पोलीस अधीक्षक गुंडाला रेड्डी राघवेंद्र यांची कटक येथील राज्य पोलीस मुख्यालयात एआयजी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुआपाडाचे पोलीस अधीक्षक अमृत पाल यांच्याकडे राज्य पोलीस मुख्यालयातील एसपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झारसुगुडाच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून सोनाली सिंह परमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या खुर्दा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

ODISHA POLICE RESHUFFLE 2026
12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती ? वाचा यादी

राज्य पोलीस मुख्यालयात एआयजी म्हणून कार्यरत असलेले ओपीएस अधिकारी तपन नारायण यांची नुआपाडाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे ओडिशाच्या पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून, अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.