'राहुल गांधी खऱ्या संसदेत पंतप्रधान होऊ शकत नाहीत'; अमित शाहांनी काँग्रेसला डिवचलं

Amit Shah Targets Congress : हैदराबादमधील भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी खऱ्या संसदेत कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
Amit Shah's statement about Rahul Gandhi becoming Prime Minister
Amit Shah's statement about Rahul Gandhi becoming Prime Ministersaam tv
Published On: 
Summary
  • राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत, अमित शहांचा टोला

  • हैदराबादमधील सभेत अमित शहांची राहुल गांधींवर टीका

  • भाजपच्या लोकशाही बचाओ अराजकता मिटाओ मोर्चात अमित शाहांचे भाषण

तेलंगणातील काँग्रेस पक्षाला मुळासकट उखडून टाका. राहुल गांधी खऱ्या संसदेत कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादेत एका मोर्चात बोलताना लगावलाय. हैदराबादमध्ये भाजपने ‘लोकशाही बचाओ, अराजकता मिटाओ’ (Save Democracy, End Anarchy) मोर्चा काढला. यात अमित शाह यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले.

Amit Shah's statement about Rahul Gandhi becoming Prime Minister
काँग्रेसचं लोकशाही संपवण्याचं षडयंत्र; लोकशाही बचाव’ पदयात्रेत मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

याप्रसंगी, त्यांनी स्थानिक नेत्यांसोबत मिळून तेलंगणातून काँग्रेस पक्षाला मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. राहुल गांधी यांनी कदाचित ‘नक्कल संसद’आयोजित केली असेल, परंतु ते प्रत्यक्ष संसदेत कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा टोला शाह यांनी लगावलाय.

जर सरदार पटेलांनी निजामाला शरणागती पत्करायला भाग पाडले नसते, तर आज हैदराबाद भारताचा भाग नसता. सरदार पटेलांनीच हैदराबादच्या निजामाला गुडघे टेकायला लावले आणि हैदराबादला आणि पर्यायाने तेलंगणाला भारताचा अविभाज्य भाग बनवले, असेही अमित शाह म्हणालेत. आज हैदराबादमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेत. काल दिल्लीतही एक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली राहुल गाधींनी आयोजित केली होती. सेव्ह द व्होट रॅली होती. परंतु, प्रत्यक्षात ती ‘मत वाचवा’ रॅली नसून, ‘घुसखोरांना वाचवा’ रॅली होती, असा आरोपही अमित शाहांनी केलाय.

Amit Shah's statement about Rahul Gandhi becoming Prime Minister
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

काँग्रेसला घुसखोरांचे रक्षण करायचंय

अमित शहा म्हणाले, “एनपीआरला (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) विरोध करून काँग्रेस पक्ष बांगलादेशी घुसखोरांचे रक्षण करायचंय. त्यांना देशाच्या मतदार याद्यांमध्ये कायम ठेवायचंय. परंतु काँग्रेसनं कितीही प्रयत्न केले तरी, जोपर्यंत प्रत्येक घुसखोराला मतदार यादीतून आणि देशातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असं मी ठामपणे सांगतो असं शाह यावेळी म्हणाले.

पंतप्रधान संसदेत विरोधकांचे युक्तिवाद पूर्णपणे मोडीत काढतील

यावेळी अमित शाह यांनी विरोधकांना आव्हान देताना म्हणाले की, आम्ही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहोत. या विषयावर चर्चा करूया. ते येणार नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे की केवळ गोंधळ निर्माण करून ते केवळ द्वेषच पसरवू शकतात. जर ते संसदेत आलेच, तर पंतप्रधान मोदी त्यांचे युक्तिवाद पूर्णपणे मोडीत काढतील." "जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होतो, तेव्हा ते ईव्हीएमला दोष देतात.

जर ईव्हीएममध्ये खरोखरच काही दोष असता, तर रेवंत रेड्डी कसे जिंकले? केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशात तुमची सरकार कसं बनलं? जर ईव्हीएम इतकीच सदोष असती, तर तुम्ही पदाची शपथच घ्यायला नको होती, असेही अमित शाह म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.