दिल्लीत इंडिआ आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मुंबईत भाजपकडून लोकशाही बचाव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाण्यातील ‘लोकशाही बचाव’ पदयात्रेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले की,“काँग्रेसचं लोकशाही संपवण्याचं षडयंत्र आहे. काँग्रेसनं रिजीमचा चेंजचा नारा दिलाय. तर आम्ही संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलोय. भारत हा नेपाळ बांगलादेश श्रीलंका नाही. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे संविधान नव्हतं हा भारत देश आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा संविधान आहे. राहुल गांधी तुमच्या आजीनेही संविधान संपवायचा प्रयत्न करून केला होता. त्या मजबूत होत्या नेत्या होत्या तरी त्या संपवू शकला नाहीत, तर तुम किस खेत की मुली हो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.